पुणे ११ एप्रिल २०२४ : फोनपे ने फेवा न्यू इयर फेस्टिव्हलचा भाग म्हणून ११ ते १४ एप्रिल दरम्यान, फोनपे नेटवर्कवर युपीआय लोकप्रिय करण्यासाठी ईसेवा आणि हॉटेल असोसिएशन ऑफ नेपाळ पोखरासोबत भागीदारी केल्याची आज घोषणा केली. न्यू इयर फेस्टिव्हल केवळ नेपाळमधील नागरिकांमध्येच लोकप्रिय नाही, तर या देशाला भेट देणाऱ्या आणि फेस्टिव्हलचा आनंद लुटणाऱ्या भारतीय पर्यटकांनाही याचे अप्रूप आहे. पारंपरिक नेपाळी खाद्यपदार्थ तसेच आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांचे स्टॉल, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांचे लाइव्ह संगीत सादरीकरण, पारंपरिक नेपाळी नृत्य आणि संगीत आणि कला प्रदर्शने व कार्यशाळा, याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम, आयकॉनिक कार्यक्रम, नेपाळी संस्कृती आणि स्थानिक पाककृती यांचा सर्वोत्तम अनुभव घेण्याची युनिक संधी येथे मिळते.
या वर्षी फेस्टिव्हलमध्ये युपीआयद्वारे डिजिटल पेमेंट लोकप्रिय करण्याच्या उद्दिष्टाने फोनपे फेवा न्यू इयर फेस्टिव्हलदरम्यान अनेक ॲक्टिव्हिटींमध्ये आघाडीवर असेल. यामध्ये फोनपे ग्राहकांना डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देता येईल आणि व्यापाऱ्यांमध्ये डिजिटल पेमेंटबद्दल जागरूकता वाढेल अशा प्रकारचे प्रत्यक्ष उपक्रम राबवेल. काही प्रमुख प्रत्यक्ष उपक्रम राबवत आणि डिजिटल ब्रँडिंग करत, डिजीटल पेमेंट आणि इतर ॲक्टिव्हिटींचा वापर कसा करायचा हे दाखवणारे किसॉक आणि ईसेवा व एचएएन पोखरा यांच्यासोबत फोनपे अन्य संवाद साधता येतील असेल उपक्रम राबवून युपीआय पेमेंटचा वापर कसा सोपा आहे ते दाखवतील.
फोनपेच्या इंटरनॅशनल पेमेंट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश पै म्हणाले, “फेवा न्यू इयर फेस्टिव्हलचा एक भाग म्हणून युपीआयला लोकप्रिय करण्यात मदत करण्यासाठी ईसेवा आणि हॉटेलियर्स असोसिएशन ऑफ नेपाळ यांच्यासोबत भागीदारी करण्यास आम्ही उत्सुक आहोत. नेपाळचे सुंदर संगीत, खाद्यपदार्थ आणि संस्कृती अनुभवण्यासाठी अनेक भारतीय पर्यटक दरवर्षी येथे आवर्जून भेट देतात. नेपाळमधल्या फोनपे नेटवर्कवर युपीआय अधिक चांगल्या प्रकारे वाढावे यासाठी व्यापाऱ्यांना शिकवणे आणि त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे याकडे आमचे सर्व लक्ष आहे. ही भागीदारी नेपाळच्या डिजिटल लँडस्केपमध्ये क्रांती घडवून आणेल, फोनपे च्या ग्राहकांना कोणत्याही ठिकाणी असूनही त्यांच्या सोयीनुसार व्यवहार करता येतील याची आम्ही काळजी घेऊ.’’
ईसेवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश खडका म्हणाले की “फेवा न्यू इयर फेस्टिव्हलसाठी फोनपे आणि हॉटेल असोसिएशन ऑफ नेपाळसोबत भागीदारी ही ईसेवा साठी नेपाळमध्ये डिजिटल पेमेंटला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी एक रोमांचक संधी आहे. आम्ही देशातील अग्रेसर डिजिटल वॉलेट असून, डिजिटल पेमेंट इकोसिस्टम वाढवणे आणि व्यापारी व ग्राहकांना यासाठी सोपा उपाय देणे यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. नेपाळसाठी भारतीय पाहुणे अतिशय महत्त्वाचे आहेत. या सहयोगाद्वारे, युपीआय आणि फोनपे नेटवर्क वापरण्याचे फायदे दाखवून देणे आणि नेपाळच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वाढीस हातभार लावत, डिजिटल व्यवहार स्वीकारण्यासाठी व्यापाऱ्यांना सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे.
फोनपेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिवास सपकोटा म्हणाले, की “फोनपे नेटवर्कवर युपीआय क्षमतांच्या एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी फोनपे इंडिया, ईसेवा नेपाळ, आणि हॉटेलिअर्स असोसिएशन ऑफ नेपाळ सोबतची धोरणात्मक भागीदारी पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. ही भागीदारी अधिक सुस्पष्ट करण्यासाठी न्यू इयर फेस्टिव्हल एक आदर्श ठिकाण आहे. या फेस्टिव्हलला मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित राहतात, यामुळे नेपाळच्या सांस्कृतिक आणि आर्थिक केंद्राची विशेष ओळख होते, तसेच प्रत्येकाला पेमेंट तंत्रज्ञानातील प्रगती पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी देते.”