‘जैन सिद्धांत शास्त्री’ यांच्या वतीने श्री महावीर जयंतीनिमित्त पंचकल्याणक विधान

लोणावळा: जैन धर्माचे २४वे तीर्थंकर, श्री १००८ भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक महोत्सवा निमीत्ताने पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील जैन सिद्धांत शास्त्री यांच्या वतीने लोणावळा येथील १००८ श्री महावीर स्वामी जैन दिंगबर मंदिर येथे अभिषेक, पूजन, महावीर पंचकल्याणक विधानाचे आयोजन मोठ्या भक्ती भावाने करण्यात आले होते. प्रसंगी धार्मिक गतिविधी व इतर गोष्टींवर शास्त्रींनी एकमेकांशी संवाद साधला. 

यावेळी मंदिराचे विश्वस्त दिनेश जैन, अखिल भारतीय दिगंबर जैन विद्वत्परिषदेचे राष्ट्रीय मंत्री जितेन्द्र राठी, शांतीनाथ पाटील, सोनुजी जैन, संतोष बोगार, अभय काने, अखिल भारतीय दिगंबर जैन विद्वत्परिषदेचे मीडिया प्रभारी सुमित अंबेकर, स्वप्नील लंबू, कुलभूषण अंबेकर, शुभम हातगिने, शैलेश घोडके, सौरभ दुरुगकर, भूषण काळेगोरे, चैतन्य मांगुळकर, शुभम पेटकर, सौरभ काळेगोरे, सचिन चौगुले, रोहित चाकोते, अक्षय जैन आदी शास्त्रीगण, परिवारातील सदस्य व भाविक उपस्थित होते.