मेडिकव्हर हॉस्पिटल भोसरी तर्फे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीर व सीपीआर कार्यशाळेचे आयोजन

समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यासाठी मेडिकव्हर हॉस्पिटल भोसरी प्रसिद्ध आहेत. यावेळी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून मेडिकव्हर हॉस्पिटल भोसरी यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन च्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी सीपीआर ट्रेनिंग कार्यशाळा व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.

याप्रसंगी मेडिकव्हर हॉस्पिटल कडून डॉ उत्सव पटेल यांनी आपत्कालीन परिस्थिती मध्ये कोणाचाही जीव वाचवण्यासाठी सीपीआर चे महत्व सांगितले व त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पठारे,महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनाली गोडबोले, पोलीस हवालदार संतोष फावडे उपस्थित होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन म्हणाले, “पोलीस कर्मचाऱ्यांची धकाधकीची जीवनशैली असते तसेच कामाचा ताण देखील अधिक असतो त्यामुळे त्यांना आरोग्य विषयक समस्या होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी योग्य वेळी योग्य आरोग्य तपासण्या करणे गरजेचे असते. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी सीपीआर प्रणाली महत्वाची असते त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल मेडिकव्हर हॉस्पिटल च्या टीम चे मनापासून आभार.”