पुणे : भारती अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) तर्फे आयोजित ‘सी – गुगली २०२४ ‘ या इंटरकॉलेजिएट टेक्निकल कॉम्पिटिशन’ चे उद्घाटन दि.५ एप्रिल रोजी सकाळी करण्यात आले . उद्घाटन सत्रात बार्कलेज च्या सहयोगी उपाध्यक्ष श्रेया पाटील, उद्योजक प्रितम सनील, बिनित सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.भारती विद्यापीठ आयएमईडीचे प्रभारी संचालक डॉ. अजित मोरे , उपप्राचार्य डॅा. रामचंद्र महाडिक यांच्या मार्गदर्शनखाली डॉ. सत्यवान हेंबाडे, प्रा. दीप्ती देशमुख, डॉ.हेमचंद्र पाडळीकर, डॉ. स्वाती देसाई डॉ. श्वेता जोगळेकर, डॉ. सुजाता मुळीक, संगीता पाटील, प्रतिमा गुंड यांनी संयोजन केले. या स्पर्धांमध्ये निंजा कोडींग, ब्रेक द क्वेरी, क्विझर्ड्स ऑफ ओ झेड, डिबगिंग ड्युएल अशा तांत्रिक प्रकारांचा समावेश होता. देशभरातून विविध महाविद्यालयातून विद्यार्थी सहभागी झाले.