‘गंधर्व सुरांची शिलेदारी’ नाट्य संगीत मैफिलीचे दि.६ एप्रिल रोजी आयोजन

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘गंधर्व सुरांची शिलेदारी’ या नाट्य संगीत मैफिलीचे दि.६ एप्रिल  रोजी आयोजन   करण्यात आले आहे. ‘मराठी रंगभूमी पुणे’ या संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हा कार्यक्रम ‘गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट,पुणे’ ही संस्था सादर करणार आहे.अस्मिता चिंचाळकर,चिन्मय जोगळेकर आणि निनाद जाधव हे  गायन सादर करणार आहेत.संजय गोगटे(ऑर्गन),अभिजित जायदे (तबला) हे साथसंगत करणार आहेत. वर्षा जोगळेकर या  निवेदन करणार आहेत. ‘मराठी  रंगभूमी, पुणे’ या  संस्थेच्या  ७५ वर्षाच्या  वाटचालीचे दर्शन  या  मैफलीत  घडेल. सौभद्र, मानापमान, सुवर्णतुला या  लोकप्रिय  नाटकातील  पदे सादर  होतील, त्याप्रमाणे काही  दुर्मिळ   नाट्यपदे ऐकायची  संधी  या  कार्यक्रमात  मिळणार आहे.

हा कार्यक्रम शनिवार,दि.६ एप्रिल   २०२४ रोजी सायंकाळी साडे पाच   वाजता  भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  होणार आहे.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २०० वा कार्यक्रम  आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.