गुरुग्राम, २३ एप्रिल २०२४ – एयर इंडिया ही भारतातील आघाडीची जागतिक विमानवाहतूक कंपनी आणि ऑल निप्पॉन एयरवेज या सर्वात मोठ्या जपानी विमानवाहतूक कंपनीने कोडशेअर करार त्यांचे नेटवर्क एकत्र केले आहे.
या व्यावसायिक भागिदारीमुळे दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना प्रवासाच्या जास्त संधी मिळतील तसेच भारत व जपानदरम्यान विमानप्रवासासाठी जास्त पर्याय मिळतील.
२३ मे २०२४ पासून अमलात येत असलेल्या या कराराअंतर्गत एयर इंडिया आणि ऑल निप्पॉन एयरवेजच्या प्रवाशांना एकाच तिकिटावर भारत व जपानच्या विमानांचा एकत्रित प्रवास करून हव्या त्या ठिकाणी पोहोचता येईल. त्याशिवाय कोडशेअर विमानातून प्रवास करणाऱ्या दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना लाउंजची सोय आणि स्टार अलायन्सद्वारे आपल्या प्रीमियम सदस्यांना दिले जाणारे प्रायोरिटी बोर्डिंग अशा सुविधा मिळतील.
२३ एप्रिल २०२४ पासून विक्रीसाठी उपलब्ध करत एयर इंडिया टोक्यो हानेडा आणि दिल्ली तसेच टोक्यो नरिता व मुंबई दरम्यानच्या विमानवाहतुकीवर एआय हा डेझिग्नेटर कोड समाविष्ट करेल, तर निप्पॉन एयरवेज आपले ‘एनएच’ डेझिग्नेटर कोड टोक्यो नरिता व दिल्लीदम्यानच्या एयर इंडिया विमानांवर समाविष्ट करेल. एयर इंडिया व एएनए लवकरच इतर मार्गांवरही हीच सेवा देण्याच्या विचारात आहे.
‘ऑल निप्पॉन एयरवेजसह करण्यात आलेला कोडशेअर करार भारत व जपान यांना जोडण्यासाठी महत्त्वाचा आहे,’ असे एयर इंडियाचे प्रमुख व्यावसायिक आणि ट्रान्सफर्मेशन अधिकारी निपुण अगरवाल म्हणाले. ‘या सहकार्यामुळे आमचे नेटवर्क, कनेक्टिव्हिटी आणि प्रवाशांना मिळणारा दर्जेदार अनुभव विस्तारला असून दोन्ही देशांदरम्यान विमानसेवेचे जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध करणे शक्य झाले आहे. एएनएसह यशस्वी सहकार्य करण्यासाठी आणि भविष्यात अशाप्रकारच्या संधी मिळवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
हा करार भारत व जपान यांच्यातील व्यावसायिक आणि आर्थिक नातेसंबंध अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाचे योगदान देईल. त्याशिवाय भारतीय पर्यटकांना जपानमधील विविध ठिकाणे पाहाण्याच्या जास्त संधी मिळेल, तर जपानी नागरिकांना उच्च दर्जाच्या सुरक्षेसह भारतात सहजपणे प्रवास करता येईल.
‘एयर इंडियासह ही धोरणात्मक भागिदारी मजबूत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. यामुळे भारत- जपानदरम्यानची विमानसेवा तसेच ग्राहक अनुभव उंचावण्यासाठी लक्षणीय पाऊल उचलले गेले आहे,’ असे ऑल निप्पॉन एयरवेजच्या अलायन्सेस आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष, बोर्डाचे सदस्य काटसुया गोटो म्हणाले.
हे सहकार्य एएनएच्या प्रवाशांना दर्जेदार हवाई वाहतूक सेवा पुरवण्याच्या बांधिलकीचे प्रतीक असून यामुळे दोन्ही देशांतील प्रवास सुलभ होईल अशी आशा वाटते.