बीएन ग्रुपने न्यूट्रिकासह वेलनेस आणि फिटनेस खाद्यतेल श्रेणीमध्ये केला प्रवेश  

पुणे, २५ एप्रिल २०२४ : भारतातील खाद्यतेल उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या बीएन ग्रुपने न्यूट्रिकाच्या माध्यमातून आरोग्य व तंदुरुस्ती खाद्यतेल क्षेत्रात पदार्पण करत असल्याची घोषणा केली आहे. सुरूवातीच्या सादरीकरणाच्या टप्प्यात या ब्रँडची तीन उत्पादने असतील. न्यूट्रिका प्रो इम्युनिटी ऑईल, न्यूट्रिका प्रो एनर्जी ऑईल आणि न्यूट्रिका प्रो फिटनेस ऑईल. या तेलांमध्ये व्हिटॅमिन सी जीवनसत्वाने समृद्ध असून  ते भारतीय कुटुंबांच्या विविध खाण्याच्या सवयी लक्षात घेऊन तयार केले आहे. त्यांचे मुख्य लक्ष संपूर्ण आरोग्य आणि फिटनेसवर आहे.

न्यूट्रिकाच्या सादरीकरणाच्या प्रसंगी बोलताना बीएन ग्रुपचे सीईओ व एमडी अनुभव अग्रवाल म्हणाले, “नाविन्यपूर्णतेच्या बाबतीत अग्रेसर राहण्याबद्दल बीएन ग्रुपची दीर्घकाळपासून ख्याती आहे. न्यूट्रिकाच्या सादरीकरणाने ही कटिबद्धता अधोरेखित झाली असून ग्राहकांच्या बदलत्या गरजा आम्हाला समजत असल्याचे त्यातून प्रतिबिंबित होते. आरोग्याबाबत जागरूक असलेले ग्राहक मोठ्या संख्येने सेंद्रिय व कोलेस्टोरॉलमुक्त पर्यायांची निवड करत आहेत. त्यामुळे न्यूट्रिका ही मागणी पूर्ण करण्यासाठी अगदी योग्य आहे, असे आम्हाला वाटते. आरोग्याबाबत जागरूक असलेल्या ग्राहकांच्या खाण्यापिण्याच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन आम्ही न्यूट्रिकामध्ये भरघोस गुंतवणूक केली आहे. येत्या तीन वर्षांत ५०० कोटी रुपयांची उलाढाल गाठण्याचे आमचे लक्ष्य आहे.”

एका ताज्या अहवालानुसार, भारतीय खाद्यतेल बाजार २०२३ मध्ये २४ कोटी ७० लाख टनांपर्यंत पोहोचला असून २०२४- २०३२ दरम्यान तो १.३५ टक्के एवढा एकत्रित वार्षिक वृद्धीचा दर गाठेल, अशी अपेक्षा आहे. न्यूट्रिका सादर केल्यामुळे हा ब्रँड आणि विविध प्रकारच्या स्वयंपाकाच्या तेलाचे पर्याय शोधणाऱ्या आणि निरोगी जीवनशैली जगण्याचे उद्दिष्ट असलेल्या आरोग्याबाबत जागरूक ग्राहक यांच्यात एक मजबूत बंध निर्माण झाला आहे.

 गुजरातमधील गांधीधाम येथील अत्याधुनिक उत्पादन युनिट असलेले न्यूट्रिका प्रो इम्युनिटी ऑईल, न्यूट्रिका प्रो एनर्जी ऑईल आणि न्यूट्रिका प्रो फिटनेस ऑईल हे दिल्ली, चंदीगड, मुंबई आणि पुणे या सादर झालेल्या बाजारपेठांमधील सर्व किरकोळ आधुनिक आणि सामान्य आउटलेटमध्ये उपलब्ध असतील. तसेच क्विक कॉमर्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरीलही ते उपलब्ध असेल.

 “तडजोड नसलेली गुणवत्ता, समकालीन तंत्रज्ञान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या ग्राहकांचे कल्याण यांवर लक्ष केंद्रित करून बाजारपेठेला नवा आकार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रिमियम खाद्यतेल तयार करण्याच्या आमच्या व्यापक अनुभवाचा लाभ असल्यामुळे स्वयंपाकाच्या क्षेत्रातील न्यूट्रिका नवे मापदंड निर्माण करेल, याची आम्हाला खात्री आहे,” असे ते पुढे म्हणाले.

बीएन ग्रुप २०१३ मध्ये आपल्या स्थापनेपासून ‘सिंपली फ्रेश’ आणि ‘हेल्दी व्हॅल्यू’  यांसारख्या ब्रँडसह भारतातील खाद्यतेल क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. जवळपास ६०० वितरक आणि ५०,००० डायरेक्ट आउटलेट्स अशी मजबूत ऑफलाइन उपस्थिती असल्यामुळे कंपनी मोठ्या संख्येने ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने पोचतील याची सुनिश्चिती करते.