भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘ वसंत प्रभा  ‘ या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन दि.२७ एप्रिल   २०२४ रोजी   करण्यात आले होते.  या नृत्य कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली ! 

नेहा दामले,फाल्गुनी कुलकर्णी,ईशा छत्रे,ईश्वरी करपे यांनी नृत्य सादरीकरण केले. अर्पिता वैशंपायन(गायन),वेदांग जोशी(तबला),अमेय बिच्चू(हार्मोनियम),तुलसी कुलकर्णी(पढंत),पार्थ भुमकर(पखवाज),उमंग ताडफळे(सतार) यांनी साथसंगत केली.कथक नृत्य प्रशिक्षक ऋजुता सोमण  आणि भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. साज जोशी यांनी सूत्र संचालन केले.

वसंत ऋुतुला  अभिवादन करून  कार्यक्रमाची सुरुवात वंदनेने झाली. पखवाज हे प्रमुख वाद्य असलेला १४ मात्रांचा ताल धमार यामधे तुकडे, तोडे , परन, गतनिकास याचे प्रभावी सादरीकरण नेहा दामले यांनी केले. ध्रुपद आणि धमारच्या माध्यमातून सादर होणाऱ्या गोपिकेला कृष्णाच्या भेटीची आस आहे आणि ती आपल्या आईला तसे सांगते .प्रेम रस  आणि भक्ती रस यांचा विरहिणी  ‘माई मेरो मन मोहो घर अंगना ‘ हे नृत्य सादर केले गेले.अद्वैताचा प्रत्यय येणारे ‘ होरी नृत्य ‘  नेहा दामले,फाल्गुनी कुलकर्णी,ईशा छत्रे,ईश्वरी करपे यांनी सादर केले. कार्यक्रमाची सांगता वसंत ऋुतू मधील चैतन्य, प्रेमरस या ‘चतरंग ”अंबुवाँ मोरे बहार आयी ‘ या नृत्य सादरीकरणाने झाली. हा कार्यक्रम शनिवार, दि.२७ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता  भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  झाला.हा कार्यक्रम विनामूल्य होता. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २०४ वा कार्यक्रम होता.