BJP : पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ; निष्ठावंतांचे मुंबईमध्ये राजीनामे
अहमदनगर मतदारसंघात भाजपने डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अहमदनगरची जागा भाजप गमावणार आहे असा आरोप करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत प्रदेश कार्यालयात जाऊन राजीनामे दिले.त्यामुळे नगर जिल्ह्यातील भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
Crime News : दारू पिऊन आईवडिलांना मारायचा मुलगा, कंटाळलेल्या बापाने उचलले टोकाचे पाऊल
यासंदर्भात खुलासा करण्यासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी अहमदनगर शहरात पत्रकार परिषद घेतली. मात्र तेही उत्तरे देताना गोंधळून गेल्याचे दिसले.भाजपचे शेवगाव तालुक्यातील पदाधिकारी सुनील रासने यांनी मुंबईत जाऊन राजीनामा दिला. खासदार विखे हे कोणाचेही फोन उचलत नाहीत. त्यांच्याबाबत लोकांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी घालवण्यासाठी त्यांनी डाळ साखर वाटण्याचा प्रयत्न केला. भाजप देशात ४०० जागा जिंकेलही मात्र नगरची जागा पक्ष गमावणार आहे. याची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना चिंता वाटते. त्यामुळेच विखे यांना उमेदवारी देऊ नये अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. मात्र पक्षाने त्याची दखल घेतली नाही. अद्यापही परिस्थिती सुधारलेली नाही. त्यामुळे आम्ही पदांचे राजीनामे देत आहोत.
पक्षाचे सदस्य म्हणून कार्यरत राहू, असे रासने यांनी सांगितले. अनेक पदाधिकारी राजीनामे देत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात सविस्तर भूमिका विशद करून तसे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिले आहे.दरम्यान, या राजीनाम्याबाबत भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी अहमदनगर येथे मंगळवारी पत्रकार परिषद घेत खुलासा करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही याबाबत काही सांगता आले नाही. ‘राजीनामा हे पत्र कायआहे, हे आम्हीच अजून पाहिलेले नाही.
पुणेकर हा वडापाव खाल्याशिवाय पुढे जात नाही, असं आहे तरी काय?
या पत्राची शहानिशा करून खुलासा करू ‘ असे ते म्हणाले. तसेच या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशचे प्रदेश सचिव अरुण मुंडे हेही उपस्थित होते. ते शेवगाव तालुक्यातील आहेत. त्यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनाही सविस्तर माहिती देता आली नाही. पत्रकारांनी प्रश्न विचारताच मुंडे यांनी फोन आल्याचे कारण सांगून पत्रकार परिषदेतून निघून गेले. दरम्यान, अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, शेवगाव पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय होईल. याबाबत आपण बोलणे उचित होणार नाही.
Big News : शिंदे गटातील बड्या नेत्याच्या गाडीवर हल्ला; वाहनावर भिरकावला दगड; कारची काच फुटली
अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात या राजीनम्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.पक्षांतर्गत नाराजी चव्हाट्यावर आल्याने विखे पाटलांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये विखे पाटलांनी कार्यकर्त्यांकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले नाही तसेच शेवगाव पाथर्डी मतदार संघामध्ये कोणत्याही प्रकारच्या विकास कामांनाही चालना दिली नाही असे मत अनेक कार्यकर्त्यांचे आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते नाराज असल्याचे समोर येत आहे.
ED BIG NEWS : पुण्यात चालले काय; ईडीचे पथक पुण्यात, गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यावर छापे
मी सुनिल रामचंद्र राराने रा. शेवगाव जि. अहमदनगर गेल्या ४५ वर्षापासून पक्ष रचनेत मी व माझा परिवार काम करत आलो आहोत. माझे पिताश्री व मातोश्रींचा १९४२ च्या आणीबाणीच्या काळात आंदोलनात सक्रिय सहभाग होता तसेच अयोध्या येथील कार सेवेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे.
ब्रेकिंग : उद्या पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार? काँग्रेसचा बडा नेता काँग्रेस सोडणार
या सर्व बार्बीचा आम्हास गर्व आहे.मी भारतीय जनता पार्टीच्या रचनेत शेवगाव शहर सरचिटनीस, शहर उपाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, तालुका सरचिटणीस असे अनेक पदावरती सेवा दिली आहे. अटल बिहारी वाजपेयी, स्व. गोपिनाथ मुंडे साहेब, स्व. दिलीप गांधी साहेब, स्व. राजीवजी राजळे साहेब यांच्या प्रेरणेने काम करत आलो आहोत. परंतु येत्या २०२४ लोकसभा निवडणुकीकरता विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना अहिल्यानगर लोकसभा मतदार संघ ३७ उमेदवारी दिल्याने भारतीय जनता पार्टीची नगर दक्षिण जाग ही धोक्यात येवू शकते.
बापरे! सुप्रिया सुळेंच्या डोक्यावर सुनेत्रा पवार, पार्थ यांचे ५५ लाखांचे कर्ज; पहा किती संपत्ती…
खासदार निवडुन गेल्यानंतर त्यांचा मतदार संघाशी संपर्क मोठया प्रमाणात तुटला आहे. नागरिकांचे, कार्यकत्यांचे फोन न उचलणे, समोरच्या व्यक्तीचे म्हणने ऐकून न घेता त्याला सुमार दर्जाचा सल्ला देणे, पार्टी म्हणजे मी, मी म्हणजे मतदार संघातील जनता असे म्हणून जनतेला, मतदाराला गृहित धरणे सिर्फ मुझे गिनो” या स्वभावामुळेच मागे जिल्ह्यात पाट आमदारांना घरी बसविण्याचे पुण्य पार्टीच्या पदरात टाकण्याचे काम यांनी केले आहेत. तसेच मतदार संघात पायाभूत सेवेचा फज्जा उडलेला आहे.
शेवगाव शहर व ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, रस्ते, वैद्यकिय संस्थाअसतानाही जिल्हयाच्या बऱ्याच तालुक्यात मलेरिया, डेंग्यू आदी रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतात.