Baramati Lok Sabha : बारामती लोकसभेमध्ये ट्विस्ट; शरद पवार मैदानात; उमेदवारी जाहीर

Baramati Lok Sabha : बारामती लोकसभेमध्ये ट्विस्ट; शरद पवार मैदानात; उमेदवारी जाहीर

Baramati Lok Sabha Election Latest News : राज्यासभ देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे वातावरण पाहायला मिळत आहे. याकाळात सर्वच राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांच्या प्रचारात गुंतले आहेत. यादरम्यान पुण्यातील बघतोय रिक्षावाला या संघटनेने जिल्ह्यात चार उमेदवारांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे बारामती मतदारसंघातून शरद पवार नावाच्या एका रिक्षाचालकाला उमेदवारी देण्यात आली आहे

उमेदवारांच्या प्रचारार्थ १८ एप्रिल २४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, SBI बँकेजवल, ५ चर्च रोड येथे दुपारी १२ वाजता प्रचार सभा घेण्यात येणार आहे. यावेळी शक्ती प्रदर्शन करणार व बारामतीचे उमेदवार शरद पवार यांचा अर्ज भरणार अशी माहिती देखील बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर केशव नाना क्षीरसागर यांच्याकडून देण्यात आली आहे.

रिक्षा, टेम्पो तसेच कॅब चालक आणि फूड डिलिव्हरी बॉय या व्यवसायातील गीग वर्कर्स यांच्या मागण्यांबाबत कोणत्याही राजकीय पक्षाने गांभीर्य न दाखवल्यामुळे, आम्ही मतदानाद्वारे आमचे आंदोलन मतपेटीतून पुढे नेत आहेत. या चार लोकसभा मतदार संघातील, ४ लाख गिग वर्कर्स व त्यांचे १६ लाख कुटुंबीय आमच्याच उमेदवारांना मतदान करून आमची ताकद आम्ही राजकीय पक्षांना दाखवून देऊ असेही भारतीय गीग कामगार मंच. / बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील उमेदवार पुढील प्रमाणे :

१) बारामती – रिक्षाचालक – शरद पवार

२) पुणे – टेम्पो चालक – मनोज वेताळ.

३) मावळ – कॅब चालक – संतोष वालगुडे

४) शिरूर – फूड डिलिव्हरी बॉय – स्वप्नील लोंढे