गुरुग्राम, 12 एप्रिल 2024 : एअर इंडिया ही भारतातील अग्रगण्य जागतिक विमान कंपनी असून, कंपनीने पाच नवीन संपर्क केंद्रे सुरू केली आहेत, जी जगभरातील ग्राहकांना चोवीस तास मदत देणार आहेत.
मुंबई, कैरो आणि क्वालालंपूर येथील केंद्रांमधून प्रीमियम सेवा व्यवस्थापित करण्यासाठी कंपनीने कॅलिफोर्निया-मुख्यालय असलेल्या कॉन्सेन्ट्रिक्स या ग्राहक प्रतिबद्धता फर्मसोबत भागीदारी केली आहे. देशांतर्गत चौकशीवर लक्ष केंद्रित करून नोएडा आणि बेंगळुरू येथे संपर्क केंद्रे चालवण्यासाठी एअरलाइनने iEnergizer सोबतही करार केला आहे.
एअर इंडियाने अलीकडेच प्रिमियम फ्रिक्वेंट फ्लायर सदस्य तसेच व्यावसायिक आणि प्रथम श्रेणी पाहुण्यांसाठी खास तयार केलेला प्रीमियम डेस्क सादर केला आहे. समर्पित सेवा वैयक्तिक सहाय्य प्रदान केल्यामुळे प्रवाशांच्या प्रतिष्ठित श्रेणीसाठी प्रवासाचा एकूण अनुभव वृद्धींगत होतो. नवीन आणि सर्वोत्तम तंत्रज्ञान पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी गुंतवणूक करून, ग्राहक सहाय्य करण्याची क्षमता वाढवणे आणि कार्यक्षमता वाढवणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
“आमचे ग्राहक कायमच आमच्या ऑपरेशन्सच्या केंद्रस्थानी आहेत. संपर्क केंद्रांची वाढ आणि विस्तार हे आमच्या ग्राहकांना सर्वसमावेशक सपोर्ट देण्यासाठीच्या एअर इंडियाच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे आणि एअर इंडियाला जागतिक दर्जाची जागतिक एअरलाइन बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे,” असे एअर इंडियाचे मुख्य ग्राहक अनुभव अधिकारी राजेश डोगरा यांनी मुंबई केंद्राच्या शुभारंभाप्रसंगी सांगितले.
एअर इंडियाने ग्राहकांना प्रभावीपणे मदत करण्यासाठी ईमेल, सोशल मीडिया आणि चॅट सपोर्टचे व्यवस्थापन करण्यासाठी एक व्यापक बॅक-ऑफिस इन्सोर्सिंग धोरण लागू केले आहे. 24/7 तक्रार व्यवस्थापन डेस्क ग्राहकांच्या सर्व शंका, समस्यांचे त्वरित निराकरण करते आणि चोवीस तास सपोर्ट उपलब्ध करून देते. कर्मचारी उत्तम दर्जाच्या मानकांचे पालन करतात आणि त्यांची कौशल्ये वाढवतात याची खात्री करण्यासाठी एक मजबूत गुणवत्ता आणि प्रशिक्षण प्रशासन फ्रेमवर्कही निर्माण करण्यात आले आहे.
अलीकडेच एअर इंडियाने आपली रिडिझाईन केलेली वेबसाइट आणि एअरलाइन उद्योगातील पहिला जनरेटिव्ह एआय चॅटबॉट- AI.g लाँच केला. चॅटबॉट वेबसाइटवर तसेच व्हॉट्सॲपवर नवीन आलेल्यांना सपोर्ट चॅनेल उघडण्यासाठी अखंड प्रवेशयोग्यता प्रदान करते, प्रवाशांना प्रवासाशी संबंधित 1300+ विषयांवर प्रश्न सोडवण्यास मदत करते.