अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली अन्…

धुळे जिल्ह्यातील शिरपूर बोराडी-पानसेमल रस्त्यावर एक अंगावर काटा आणणारा अपघात झाला आहे. स्विफ्ट डिझायर कार वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातात कार थेट पुलाखाली जाऊन कोसळली. या अपघातात चौघे जण जखमी झाले असून त्यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे.

‘जय श्रीराम’ लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना केलं पास; प्राध्यापकांची हकालपट्टी

शहादा येथील कलीम इब्राहिम खाटीक हे आपल्या कुटुंबीयांसोबत पानसेमल कडून बोराडी मार्गे शहादा कडे जात होते.  बोराडी लगत असलेल्या लेंडी नाल्याजवळ त्यांची कार आली. त्यावेळी त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट पुलाखाली जाऊन कोसळली. या अपघातामध्ये कलीम खाटीक, लकी कलीम खाटीक, माहील कलीम खाटीक आणि एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; राजकीय वातावरण पुन्हा तापणार?

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी जखमींना शिरपूर येथील इंदिरा मेमोरियल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. चारही जखमींवर या ठिकाणी उपचार करण्यात आले. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Video Call : सोशल मीडियावर ओळख मग मैत्री, तरूणीने नको त्या अवस्थेत व्हिडीओ कॉल केला अन्…

या अपघातात कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. बोराडी परिसरामध्ये असलेल्या जवळपास सर्वच नाल्यांना संरक्षण कठडे नाहीत. त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना होत आहेत. अनेकदा याबाबत तक्रार करूनही बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.

आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना