‘इन्व्हेस्को’सोबत भागीदारी करून ‘इन्व्हेस्को इंडिया ॲसेट मॅनेजमेंट लि.’मधील ६० टक्के

मुंबई, एप्रिल २०२४ – बँकिंग आणि आर्थिक मालमत्तांमध्ये अनेक गुंतवणूक असलेली मॉरिशसस्थित गुंतवणूक होल्डिंग कंपनी इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड (आयआयएचएल) आणि इन्व्हेस्को लि. या कंपन्यांनी एक संयुक्त कंपनी (जेव्ही) उभारण्यासाठी करार केला आहे. या करारानुसार, आयआयएचएल ही कंपनी ‘इन्व्हेस्को ॲसेट मॅनेजमेंट इंडिया लिमिटेड’मधील (आयएएमआय) ६० टक्के समभाग घेणार आहे. ही माहिती या दोन्ही कंपन्यांच्या वतीने आज येथे देण्यात आली.

इन्व्हेस्को लि. या जागतिक गुंतवणूक व्यवस्थापन क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीची आयएएमआय ही भारतीय शाखा आहे. ती १.६ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक मूल्याच्या संपत्तीचे व्यवस्थापन करते. आयआयएचएल ही इंडसइंड बँकेची प्रवर्तक संस्था आहे. इंडसइंड बॅंक ही बीएसई व एनएसई या स्टॉक एक्सचेंजेसवर सूचीबद्ध असलेली भारतातील खासगी क्षेत्रातील पाचवी मोठी बँक आहे. ती भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे नियंत्रित केली जाते. नव्याने स्थापन झालेल्या ‘जेव्ही’मध्ये ‘इन्व्हेस्को’चा हिस्सा ४० टक्के असेल. आयआयएचएल व इन्व्हेस्को या दोघांनाही या ‘जेव्ही’मध्ये प्रायोजकत्वाचा दर्जा असेल.

आयएएमआय ही भारतातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी विदेशी मालमत्ता व्यवस्थापक कंपनी असून देशांतर्गत मालमत्ता व्यवस्थापनामध्ये ती १७वी मोठी कंपनी आहे. देशभरातील ४० शहरांमध्ये तिची उपस्थिती आहे. दि. ३१ मार्च २०२४ रोजीच्या आकडेवारीनुसार, तिच्या व्यवस्थापनाखाली ८५३.९३ अब्ज डॉलर्सची मालमत्ता आहे, तसेच ती ऑनशोअर आणि ऑफशोअर सल्लागार म्हणूनही काम करते.

आयआयएचएल आणि इन्व्हेस्को या दोन्ही भागीदारांनी आपापली सामर्थ्ये या संयुक्त उपक्रमात एकत्रित आणली आहेत. ‘इन्व्हेस्को’तर्फे जागतिक उत्पादने आणि प्रक्रिया यांचा पोर्टफोलिओ, तर ‘आयआयएचएल’तर्फे भारतभरातील ११ हजाराहून अधिक टच पॉइंट्स आणि ४.५ कोटी ग्राहक यांचे मोठे नेटवर्क या जेव्हीमध्ये सामील होणार आहे.

‘आयआयएचएल’ची स्थापना स्व. एस. पी. हिंदुजा यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली १९९३मध्ये झाली. ही एक गुंतवणूक होल्डिंग कंपनी आहे. मॉरिशसच्या ‘फायनान्शिअल सर्व्हिस कमिशन’ने तिला ग्लोबल बिझनेस लायसेन्स दिलेले आहे. रितसर संचालक मंडळाद्वारे शासित होणाऱ्या या कंपनीच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये बँकिंग सेवा (इंडसइंड बँक, स्टर्लिंग बँक अॅंड ट्रस्ट लि. – बहामाज), भांडवली बाजार मालमत्ता (आफ्रिनेक्स एक्सचेंज लि., मॉरिशस, १३.५ अब्ज डॉलर्सच्या अंतर्निहित सिक्युरिटीजची एकत्रित सूची) आणि विशेष स्वरुपाच्या वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (बेरिलस कॅपिटल-यूके, स्वित्झर्लंड व सिंगापूर) यांचा समावेश आहे.

रिलायन्स कॅपिटल लि. ही कंपनी आणि आयुर्विमा, आरोग्यविमा, इतर विमा, मालमत्ता पुनर्रचना, संशोधन आणि सिक्युरिटीज ब्रोकिंग या क्षेत्रातील तिच्या उपकंपन्या यांच्या अधिग्रहणासाठी ‘आयआयएचएल’ने बोली लावली होती, तिला ‘एनसीएलटी’ने नुकतीच मंजुरी दिली आहे. या रिझोल्यूशन प्लॅनची अंमलबजावणी पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आयआयएचएलचे अध्यक्ष अशोक हिंदुजा म्हणाले, “इन्व्हेस्कोसोबतची ही भागीदारी आमच्या ‘पार्टनरशिप फॉर ग्रोथ’ आणि ‘ॲक्ट लोकल थिंक ग्लोबल’ या व्यावसायिक तत्त्वज्ञानाशी व तत्त्वांशी सुसंगत आहे, तसेच आमच्या भागधारकांसाठी मूल्यनिर्मिती करण्याच्या आमच्या प्रवासातील हे आणखी एक पाऊल आहे. ‘आयआयएचएल’चे रुपांतर ‘बीएफएसआय पॉवरहाऊस’मध्ये करणे, हे आमचे एक उद्दिष्ट होते. पारदर्शक आणि कार्यक्षम रीतीने ‘शेवटच्या घरातील अखेरच्या गुंतवणुकदारा’पर्यंत पोहोचण्याचा आणि ‘म्युच्युअल फंड सही है’ असे म्हणत गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

“भारतातील ॲसेट मॅनेजमेंट उद्योगाला परिवर्तनाच्या नवकल्पना युगात आणण्यासाठी ‘इन्व्हेस्को’सोबत काम करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. वाढती समृद्धी, गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास आणि अनुकूल लोकसंख्याशास्त्र यांचे पाठबळ लाभलेल्या भारताला या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत आणि त्या दृष्टीने आमच्यासाठीही ही सर्वात योग्य वेळ आहे,” असे आयआयएचएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोझेस हार्डिंग म्हणाले.

“भारतासारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत इथल्या स्थानिक गुंतवणूकदारांना सेवा देण्यासाठी आम्ही आमच्या उच्च दर्जाच्या, जागतिक गुंतवणूक क्षमता उपयोगात आणू इच्छितो. त्याकरीता ‘आयआयएचएल’सोबत भागीदारी करण्यास आम्ही उत्सुक आहोत,” असे इन्व्हेस्को एशिया पॅसिफिकचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्र्यू लो म्हणाले. “आम्ही भारतभरातील आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि हैदराबादमध्ये व्यवसाय वाढविण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असेही त्यांनी सांगितले.

‘आयएएमएल’ने २००८च्या उत्तरार्धात ‘लोटस इंडिया ॲसेट मॅनेजमेंट कंपनी’चे अधिग्रहण केले आणि भारतात काम करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून, १६ लाख किरकोळ गुंतवणूकदारांना आणि ३९ हजारांहून अधिक संख्येने नियुक्त केलेल्या वितरकांना सेवा देण्याइतपत तिची वाढ झाली आहे. तिच्या ‘एयूएम’मध्ये इक्विटी आणि इक्विटी-स्वरुप मालमत्तांचे प्रमाण ७० टक्क्यांहून जास्त आहे. ‘इन्व्हेस्को’चे हैदराबादमध्ये एंटरप्राइझ सेंटर आहे. तेथे कंपनीचे माहिती तंत्रज्ञान, गुंतवणूक ऑपरेशन्स, वित्त, अनुपालन आणि मनुष्यबळ विकास हे जागतिक विभाग आहेत. त्यांत १७००हून अधिक कर्मचारी काम करतात.

“भारतातील शहरांमध्ये गावांमध्ये म्युच्युअल फंड उद्योगाची वाढ मोठ्या जोमाने होत आहे. नव्या जेव्हीचा विस्तार होण्याच्या दृष्टीने देशांतर्गत पातळीवर एक मजबूत भागीदार हवा होता. तो आता मिळाला आहे. विविध स्तरांतील नागरिकांची वाढती क्रयशक्ती, मध्यमवर्गाची वाढती लोकसंख्या यांचा विचार करता, म्युच्युअल फंड आणि ईटीएफ यांसारख्या पारदर्शक गुंतवणूक उत्पादनांना प्राधान्य मिळेल. या अनुषंगाने भारतीय म्युच्युअल फंड उद्योग सध्या निर्णायक वळणावर आहे,” असे इन्व्हेस्को सेट मॅनेजमेंट इंडिया लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ नानावटी म्हणाले. नवीन जेव्ही कंपनीचे नेतृत्व नानावटी यांच्याच हाती असणार आहे. त्यामध्ये त्यांच्यासोबत सध्याचा व्यवस्थापन संच कायम राहणार आहे.

हा भागीदारीचा व्यवहार नियामक मंजुरींच्या अधीन आहे. या व्यवहाराचा ‘इन्व्हेस्को लि.’वर अभौतिक आर्थिक परिणाम होईल.

मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजर्स या कंपनीने ‘आयआयएचएल’साठी विशेष आर्थिक सल्लागार म्हणून काम केले. क्रॉफर्ड बेली आणि एझेडबी यांनी अनुक्रमे आयआयएचएल व इन्व्हेस्को यांचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम केले.