InvITs आज विविध पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये ४ लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करत असून पुढील दशकात त्यात ६-८ लाख कोटी रुपयांची भर होण्याची शक्यता आहे.
गुंतवणुकीच्या विविध प्रमाणासह InvITs द्वारे पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचा नियमन केलेला, पारदर्शक आणि तरल मार्ग आहे.
इंडिया ग्रिड ट्रस्टने जून २०१७ मध्ये सूचीबद्ध झाल्यापासून डिसेंबर २०२३ पर्यंत प्रति युनिट ८२.४१ रु. पासून ४,६६७ कोटी रु. वितरित केले आहेत.
इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvITs) २०१४ मध्ये भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आले आणि गेल्या दशकात पोर्टफोलिओ विविधीकरणासाठी निवडीचे साधन म्हणून उदयास आले आहेत. ते उच्च जोखीम-समायोजित एकूण परतावा प्रदान करतात.
आज भारतात सेबी कडे नोंदणीकृत 24 InvITs असून त्यांनी २०१९ पासून इक्विटीमध्ये १ लाख कोटी रु.हून अधिक निधी उभारला आहे. २४ पैकी १४ InvlT खाजगीरित्या सूचीबद्ध आहेत आणि ४ सार्वजनिकरित्या सूचीबद्ध आहेत. सार्वजनिकरित्या सूचीबद्ध असलेले ४ InvITs चे एकत्रित बाजार भांडवलमूल्य २५,००० कोटी रु. इतके आहे.
गेल्या दशकभरात भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून २०१७ पासून ६७ लाख कोटी रु. हून अधिकची गुंतवणूक झाली आहे. याशिवाय, सरकारच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइन (NIP) आणि राष्ट्रीय मुद्रीकरण योजनेसह (NMP), पायाभूत मालमत्ता विकास आणि त्याचे मुद्रीकरण या लक्षणीय वाढीचे साक्षीदार आहेत. इन्फ्रा डेव्हलपमेंट मूल्य साखळीमध्ये InvITs च्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे विकसकांना खेळते भांडवल आणि गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या आकर्षक संधी मिळतात. हे वातावरण त्यांच्या वाढीसाठी खूप पोषक आहे.
गतकाळात गुंतवणूकदारांनी निवडक विकसक किंवा OEM च्या किंवा कर्जाच्या माध्यमातून इक्विटी मालकीद्वारे देशाच्या पायाभूत विकासात भाग घेतला. तथापि, InvITs ने ही गोष्ट बदलली आहे आणि अंशात्मक गुंतवणुकीवर आणि किमान तिमाही/अर्धवार्षिक उत्पन्नासह थेट मालमत्तेच्या मालकीची संधी सादर केली आहे.
किमान ८०% उत्पन्न निर्माण करणाऱ्या पायाभूत मालमत्तेची मालकी असताना आणि त्यांच्या गुंतवणूकदारांना अर्ध-वार्षिक/त्रैमासिक किमान ९०% निव्वळ वितरण करण्यायोग्य रोख प्रवाह (NDCF) वितरीत करताना, उच्च पातळीवरील प्रशासन आणि पारदर्शकतेसह कार्य करणे InvITs साठी आवश्यक आहे. ७०% च्या लीव्हरेज कॅपसह आणि AAA- रेटिंगच्या अधीन, InvITs कडे पायाभूत सुविधांच्या मालमत्तेमध्ये अति-लाभ टाळण्याची क्षमता असते आणि रोख प्रवाहाबाबत अधिक दृश्यमानता देते. यामुळे गुंतवणूकदारांना अतिरिक्त दिलासा मिळतो आणि सार्वजनिकरित्या व्यापार केलेल्या युनिटद्वारे, त्यांच्या आवडीच्या गुंतवणुकीच्या आकारात पायाभूत सुविधा मालमत्तेत गुंतवणूक करण्याची एक आदर्श संधी मिळते.
इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी मेघना पंडित म्हणाल्या,
“InvITs हे एक अद्वितीय गुंतवणूक प्लॅटफॉर्म आहेत. ते विकसकांना नवीन विकास प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांचे भांडवल मुक्त करण्याची संधी देत असले तरी ते गुंतवणूकदारांना आपल्या देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकास गाथेत सहभागी होण्याची आणि स्थिर परतावा मिळवण्याची संधी देतात.
कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि पारदर्शकतेच्या उच्च मापदंडांसह कार्यरत राहून InvITs ते निर्माण करत असलेल्या निव्वळ वितरण करण्यायोग्य रोख प्रवाहांपैकी किमान ९०% गुंतवणूकदारांना परत करणे अनिवार्य आहे आणि पोर्टफोलिओमध्ये किमान ८०% उत्पन्न निर्माण करणारी मालमत्ता असणे गरजेचे आहे. आपल्या चांगल्या-गुणवत्तेची मालमत्ता, रेटिंग आणि अंदाजे रोख प्रवाह यासह InvITs हे गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक गुंतवणूक पर्याय असल्याचे सिद्ध झाले आहे.”