भारताच्या आधार कार्ड, यू. पी. आयचा जगभरात दबदबा – डॉ. प्रमोद वर्मा 

भारतात झपाट्याने झालेल्या डिजिटल क्रांतीमुळे  यु.पी.आय आधार कार्डमुळे संपूर्ण देश व देशातील नागरिकांना एक संघ जोडण्यात भारताला यश आले. यु.पी.आय सध्या जगभरातील जवळपास 10 देशात सर्रासपणे वापरले जाते. डिजिटलवरील डीपीजी टेक फ्यूजनवरती आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. प्रमोद वर्मा बोलत होते. 

सनबर्ड समूह आणि टेकडी टेक्नॉलॉजीस् ने या परिषदेचे आयोजन सिंबोयसिसचे ईशान्य सभागृह विमाननगर येथे

केले होते. एकस्टेप फाउंडेशनचे प्रमुख मधुचंद्रा आर, सह संस्थापक टेकडी टेक्नॉलॉजीस् चे पार्थ लवाटे, संतोष वसाभक्तुला, शशि कुमार गणेशन, निखिल वेल्पनूर, दीनानाथ खोलकर, अतुल तुळशीबागवाले, मंदार वधावेकर हे मान्यवर उपस्थित होते.

 या प्रसंगी बोलताना माजी मुख्य आर्किटेक्ट आधार, युपीआय आणि इंडिया स्टॅक, सिटिओ एकस्टेप फाउंडेशनचे डॉ. प्रमोद वर्मा म्हणाले की भारत नवीन स्केल आणि गतीसह डिजिटल पायाभूत सुविधांच्या उभारणीत धोरणात्मक बदल करत आहे. डिजिटल सार्वजनिक वस्तू (डीपीजी), डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डीपीआय) नवीनता आणि सर्जनशीलताला चालना मिळत आहे. भारत नवीन स्केल आणि गतीसह डिजिटल पायाभूत सुविधांच्या उभारणीत धोरणात्मक बदल करत आहे हे लक्षात घेऊन नवोदित हे परिवर्तनाची प्रेरक शक्ती आहेत.  त्यांनी नवोन्मेषकांना आणि स्टार्ट-अप्सना मार्केट इनोव्हेशनचा अवलंब करण्याचे ओपन स्टँडर्ड्स आणि डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापर करून विकास आपण जलद गतीने करू शकतो.

 अनेक देश खरोखरच शाश्वत आर्थिक विकासाच्या शक्यतेची पुनर्कल्पना करत आहेत आणि ते कसे करता येते हे भारताने जगाला दाखवून दिले आहे,” डीपीआय क्षेत्रातील चांगल्या तंत्रज्ञान कौशल्यांसह नवोन्मेषकांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी आणि तरुणांमध्ये नवोपक्रम आणि उद्योजकतेची भावना बिंबवली पाहिजे. यासाठी तरुणांनी व तंत्रज्ञानामध्ये कार्यरत असणाऱ्या तरुणांनी या परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला होता. पुढील तीन वर्षांमध्ये, भारताचा क्रेडिट सिस्टीम, लॉजिस्टिक आणि ई-कॉमर्स सारख्या क्षेत्रांमध्ये योगदान मोठे असेल. डिजिटल क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी पुणेकरांची आहे. पुणेकरांचे डिजिटलायझेशन मधील योगदान महत्वाचे हे नेहमी देशाच्या लक्षात राहील. उद्या (ता.२३) सकाळी १०.०० वा. पर्सिस्टंट सिस्टमचे मुख्य आनंद देशपांडे हे डिजिटलायझेशन वरती मार्गदर्शन करणार आहेत.