हुकूमशाहीविरुद्ध लढणाऱ्या तरूणाईचा २३ मार्च रोजी सन्मान

पुणे : हुकूमशाहीविरुद्ध लढणाऱ्या तरूणाईचा  सन्मान ‘बोल के लब आजाद है तेरे’ या कार्यक्रमात  पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.दि.२३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे पुण्यातील विविध सामाजिक आणि परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत जोडो अभियान, पुणे आणि इंडिया आघाडी तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून संयोजनात  युवक क्रांती दल, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, निर्भय बनो, जनसंघर्ष समिती, स्वराज अभियान, एनएस यु आय , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरदचंद्र पवार), जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, अभ्यासिका विद्यार्थी कृती समिती या संस्था,संघटना सहभागी आहेत. प्रसिध्द अभिनेते किरण माने,दिग्दर्शिका शिल्पा बल्लाळ,लेखक,अभ्यासक प्रा. डॉ. श्रीरंजन आवटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विविध आंदोलनातून हुकूमशाहीच्या विरोधात निर्भयपणे लढणाऱ्या अप्पा अनारसे,सचिन पांडुळे,भक्ती कुंभार,एड.बाळकृष्ण निढाळकर,एड.संदीप ताम्हणकर,आश्चर्या  अशा अनेक युवा प्रतिनिधींचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.