भारतात पहिल्यांदाच फॉरेव्हर ग्लोबल रॅली २०२४ चे आयोजन

पुणे३० मार्च २०२४ : फॉरेव्हर ग्लोबल रॅली २०२४ च्या निमित्ताने फॉरेव्हर लिव्हिंग प्रॉडक्ट्स चा सर्वात मोठा कार्यक्रम नवी दिल्ली येथे ९ एप्रिल ते १४ एप्रिल २०२४ या दरम्यान होणार असून ही रॅली एक अविस्मरणीय कार्यक्रम होईल असा विश्वास आहे.

फॉरेव्हर लिव्हिंगने या असाधारण उपक्रमाचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे केले आहे. परिवर्तनकारी प्रशिक्षणखिळवून ठेवणाऱ्या कार्यशाळासमर्पित प्रयत्नांसाठी होणारे कौतुक आणि भव्य रॅली शो यांच्यामुळे हा कार्यक्रम सहभागी लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. या ग्लोबल रॅलीमध्ये १०० देशांमधील १२,००० व्यक्ती एकत्र येणार आहेत. फॉरेव्हर लिव्हिंग प्रॉडक्ट्सच्या दृष्टीने आणखी एक यशस्वी वर्ष ते साजरे करतील.

यावर्षी फॉरेव्हर ग्लोबल रॅलीचे आयोजन भारतात होत असल्यामुळे देशाला मोठा फायदा होईलअशी अपेक्षा आहे. पर्यटनाला मिळणारी चालना आणि आतिथ्य व पर्यटन क्षेत्रामध्ये कार्यरत हजारो भारतीयांना होणारा लाभ यांचा त्यात समावेश आहे.

फॉरेव्हर लिव्हिंग प्रॉडक्ट्सचे सीईओ ग्रेग मॉघन यांनी आग्रहाने सांगितले की एफजीआर २०२४ ही यात सहभागी होणाऱ्या लोकांसाठी जागतिक आव्हानांमधून मार्ग काढून नव्या संधी शोधण्याची संधी आहे. ही वार्षिक ग्लोबल रॅली सर्वांना एकत्र आणून फॉरेव्हर लिव्हिंग प्रॉडक्ट्सचे यश साजरे करण्याचे काम करते. त्यासाठी नेत्रदीपक वातावरण आणि एक असाधारण कार्यक्रम असतो.

या जागतिक एकत्रीकरणात १४० पेक्षा अधिक देशांमधील फॉरेव्हर बिझिनेस ओनार्स एकत्र येणार आहेत. नवीन उत्पादनांची माहिती घेणेव्यावसायिक धोरणांचे आदानप्रदान करणेप्रेरणा घेणेमनोरंजनाचा आस्वाद घेणे आणि वैयक्तिक व सामुदायिक यशाचे कौतुक करून त्याचा आनंद घेणे यासाठी हा एक मंच ठरणार आहे. यासाठी पात्र ठरलेल्यांना एका लक्षणीय स्थानाच्या पार्श्वभूमीवर असामान्य अनुभव मिळणार आहे. आपल्या सामाजिक जबाबदारीला अनुसरूनरेक्स मॉघन फॉरेव्हर लिव्हिंग फाऊंडेशनच्या (आरएमएफजीएफ) माध्यमातून फॉरेव्हर ग्लोबल रॅली २०२४ च्या दरम्यान सुरू असलेल्या उपक्रमांशी फॉरेव्हर संलग्न आहे. आरएमएफजीएफ फॉरेव्हर ग्लोबल रॅली २०२४ च्या वेळी चॅरिटी वॉटरला पाठिंबा देत असून यातून उभा राहणारा निधी भारतातील वंचितांसाठी थेट वापरण्यात येणार आहे. त्यांना त्यातून पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. या उपक्रमांमधून महिलामुले आणि नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या समूहांसाठी काम करणाऱ्या संघटनांनासुद्धा आधार देण्याचे उद्दिष्ट आहे.