पुण्याच्या देवेन पाटीलची इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड “ मध्ये नोंद

पुण्याच्या शिरपेचात अभिमानाचे मोरपीस खोवणारी गोष्ट म्हणजे देवेन पाटील ने “ इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड “ मध्ये नोंद केली आहे. देवेन पाटील याने १ मिनिट आणि ५  सेकंदांत सुमारे ५० गणिताचे ३ रे मूळ म्हणजे  क्यूब रूट काढणारी गणिते सोडवून “ फास्टेस्ट चाइल्ड टू सॉलव्ह् क्यूब रूट “ या नावाने त्याचे रेकॉर्ड बनले आहे. जे १ गणित सोडविण्यासाठी सुमारे ३ ते ५ मिनीटे लागतात तशी ५० गणिते सोडवली. देवेन पाटील याचे अवघे वय १२ वर्षे असून एस. सी. मास या इन्स्टिट्यूट मधून सुजाता हलवाई यांनी त्याला प्रशिक्षण देवून सराव करून घेतल्या नंतर त्याला रेकॉर्डसाठी पाठविले होते. 

सुजाता हलवाई म्हणाल्या की आजच्या विद्यार्थ्याना देवेन पाटील हा आदर्श आहे. गणिताची भिती जाऊन गणिते सोपे असतात ही त्याने दाखवून दिले आहे. गणिताची संगत एक गमंत असे त्याला वाटते. देवेन पाटील हा “ सिग्नेट पब्लिक स्कूल न्यू नऱ्हे येथे तो शिकत आहे. जे. एस. पी. एम. इन्स्टिट्यूटचे ट्रस्टी रुषिराज सावंत, शाळेच्या प्राध्यापिका अजिता परभत, शिक्षकवर्ग आणि मित्र परिवार यांनी त्याचे कौतुक केले. अशी माहिती एस. सी. मास इन्स्टिट्यूटच्या सर्वेसर्वा सुजाता हलवाई यांनी दिली.