हिंदू जनजागृती समितीची संस्कृती रक्षण आणि पर्यावरण रक्षण मोहीम !

पुणे, मार्च – होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालावा, तसेच महिला सुरक्षेसाठी सहकार्य करावे, या मागणीसाठी 18 मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्यात आले. सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झालेल्या खडकवासला जलाशय रक्षण मोहीमेच्या 21 वर्षांतील यशस्वीतेविषयी समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना माहिती सांगितली. निवेदने सादर करताना समितीचे श्री कृष्णाजी पाटील आणि अन्य कार्यकर्ते प्रत्यक्ष उपस्थित होते.
खालील ठिकाणी निवेदन देण्यात आले.
1. विशेष शाखेचे पोलीस उपआयुक्त श्री. हिम्मत जाधव यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातील सूत्राविषयी जाधव यांना अवगत केले असता दोन्ही उपक्रम खूप छान आहेत, याकरता योग्य त्या कार्यवाहीसाठी निवेदन तत्परतेने पुढे पाठवतो तसेच माझ्याकडून जे सहकार्य अपेक्षित आहे ते अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करेन असे त्यांनी सांगितले.
2. पुण्याचे राखीव उपजिल्हाधिकारी श्री.नामदेव टिळेकर यांना निवेदन देण्यात आले. व्यस्तता असताना ही स्वतःहून येवून तत्परतेने निवेदन स्विकारले. निवेदनातील सूत्रांचे विवेचन समितीच्या माध्यमातून केले असता या दोन्ही निवेदनावर तत्परतेने कार्यवाही करू असे टिळेकर यांनी सांगितले.
3. मा.तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले.
4. खडकवासला जलाशय रक्षणासाठी आवश्यक ते सहकार्य मिळणेबाबतचे निवेदन मा.अधिक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे विभाग पुणे आणि मा.कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांना देण्यात आले.
स्थानिक, प्रशासन आणि समाज यांची सांगड घालून आणि गेली 21 वर्षे सातत्याने समिती अत्यंत चांगल्या प्रकारे मोहीम 100% यशस्वीपणे पार पाडत आहे हे खूपच चांगले कार्य आहे. असा सकारात्मक प्रतिसाद सर्वांकडून लाभला. तसेच समितीला या मोहीमेसाठी आवश्यक ते साहाय्य करण्याचे आश्वासनही करण्यात आले. यावेळीही 22 व्या वर्षी ही मोहीम राबवण्यात येणार आहे.