पुणे, महाराष्ट्र १४ मार्च २०२४ – कोपा मॉल या पुण्यातील आघाडीच्या लाइफस्टाइल डेस्टिनेशनला ‘लॉक द बॉक्स’चे आगमन होत असल्याचे जाहीर करताना आनंद होत आहे. पुस्तकांची अनोखी दुनिया उपलब्ध करून देणारे प्रदर्शन १५ ते २४ मार्च २०२४ दरम्यान दररोज सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्व वयोगटाच्या वाचकांसाठी अनोखा अनुभव देणारा असेल. या कार्यक्रमाद्वारे ‘फिल अ बॉक्स’ पर्याय देण्यात येणार आहे, ज्यामध्ये पुणेकरांना आधी निश्चित केलेल्या आकाराचा एक बॉक्स खरेदी करून त्यामध्ये मावतील तितकी पुस्तके भरता येतील.
बुक चोर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लॉक द बॉक्स’मध्ये वेगवेगळ्या प्रकारची तब्बल गहा लाख पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्याशिवाय लहान मुलांच्या आवडत्या लेखकांच्या भेटीचे सत्र वीकेंडदरम्यान संध्याकाळी (खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार) आयोजित करण्यात येणार असून त्यात मुलांना आपल्या आवडत्या गोष्टीमागची प्रक्रिया समजून घेण्याची अभूतपूर्व संधी मिळेल.
तरुण वाचक आणि किशोरवयीन मुलामुलींना लहान मुलांचे साहित्य व यंग अडल्ट फँट्सीवर आधारित विविध पुस्तके पाहाण्याची संधी मिळेल. अभिजात पुस्तकांपासून नव्या पुस्तकांपर्यंत पुस्तकांचा हा खजिना त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देईल व त्यांना जादुई विश्वात घेऊन जाईल.
पुस्तकांच्या विस्तृत श्रेणीबरोबरच इथे पुस्तकप्रेमींना आपल्या संग्रहाचा विस्तार करण्याची संधी मिळेल. पुणेकर त्यांची जुनी पुस्तके देऊन नवी खरेदी करू शकतील, जुनी पुस्तके विकू शकतील किंवा इतर पुस्तक प्रेमींबरोबर शेअर करू शकतील. पुस्तक प्रदर्शनाचा हा अनुभव आणखी चांगला व्हावा या हेतून इथे वेगवेगळी पॅकेजेस दिली जाणार आहेत. छोटा बॉक्स (रू.११९९) – ज्यात १२-१२ ठराविक पुस्तके मिळतील, मध्यम बॉक्स (रू.१९९९) ज्यात १७-२० पुस्तके दिली जातील, तर मोठा बॉक्स (रू.२९९९) घेतल्यास २५-३० पुस्तके मिळतील. ही पॅकेजेस पुस्तकप्रमींना वाचनाचा अनोखा अनुभव त्यांच्या बजेटमध्ये मिळवून देतील. कोपामध्ये आयोजित करण्यात आलेली साहित्यविश्वाची ही अनोखी पर्वणी चुकवू नका.