मुंबई, २१ मार्च,२०२४ : पॉलिसीबाझार फॉर बिझनेसने आपल्या सल्लागार मंडळावर उद्योगपती दिनेश वाघेला, एव्ही राव आणि एस नागराज तीन इंडस्ट्री लीडर्स यांचा समावेश केला आहे. श्री अजित कुमार, माजी महाव्यवस्थापक, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड,जनरल इन्शुरन्स उद्योगातील ३७ वर्षांपेक्षा जास्त अनुभवासह ते सल्लागार मंडळात सामील झाले आहेत. ३५ वर्षांहून अधिक अनुभवासह, दिनेश वाघेला आता पॉलिसीबझार फॉर बिझनेसमध्ये सहयोगी संचालक आणि मार्गदर्शक म्हणून काम पाहतील. वाघेला यांनी यापूर्वी विमा उद्योगातील अनेक नामांकित संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत.वाघेला यांनी २५ वर्षे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन मध्ये काम केले आहे, जिथे त्यांनी विमा उद्योगाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आता पॉलिसीबझार फॉर बिझनेसमधील त्यांच्या नवीन पदावर, ते पुनर्विमा क्षेत्रात सहयोगी संचालक आणि मार्गदर्शक म्हणून काम करतील.
नॅशनल इन्शुरन्समध्ये ३३ वर्षांहून अधिक अनुभव असलेले व उद्योगातील गुंतागुंतीची सखोल माहिती असलेले एव्ही राव यांनी २०१७ मध्ये बंगळुरूमध्ये अग्निशमन/अभियांत्रिकी/मोटर तांत्रिक विभाग/वित्त विभाग आणि २०१२ मध्ये हैदराबादमध्ये तांत्रिक विभागाचे प्रमुख म्हणून काम केले आहे.
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे सेवानिवृत्त मुख्य प्रादेशिक व्यवस्थापक आणि लार्ज कॉर्पोरेट आणि ब्रोकर्स सेलचे प्रमुख. नागराज पॉलिसीबझार फॉर बिझनेसच्या सल्लागार मंडळात सामील झाले आहेत.
पॉलिसीबझार फॉर बिझनेसचे प्रमुख सज्जा प्रवीण चौधरी म्हणाले, “पॉलिसीबझार फॉर बिझनेसची ताकद ग्राहकांना प्रथम स्थान देण्याच्या वचनबद्धतेमध्ये आहे. हे सल्लागार मंडळ त्याच दिशेने एक पाऊल आहे कारण ते ब्रँड्सना भारतातील व्यवसाय विमा क्षेत्रातील उपाय सुधारण्यासाठी आणि एकत्रित करण्यासाठी व्यावहारिक ज्ञान वापरण्यास मदत करतील.”