गुरुग्राम, २० मार्च २०२४ – एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या विमानवाहतूक कंपनने सेल्फ- सर्व्हिस चेक- इन आणि सेल्फ बॅगेज ड्रॉप सुविधा लाँच केली असून केंपेगौडा विमानतळ बेंगळुरू ते सॅन फ्रान्सिस्कोदरम्यान प्रवास करणाऱ्यांना तिचा लाभ घेता येईल.
ही सुविधा एयर इंडियाच्या देशांतर्गत विमानवाहतुकीवर विमानतळांवर उपलब्ध असून बेंगळुरूपासून एयर इंडियाद्वारे सेवा दिल्या जाणाऱ्या सिंगापूर आणि मेल शहरात ही सेवा सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.
ही स्वयंचलित सेवा बेंगळुरू- भारताच्या सिलिकॉन व्हॅलीवरून जगाचे तंत्रज्ञान हब असलेल्या सिलिकॉन व्हॅलीपर्यंत प्रवास करणाऱ्या आमच्या टेक- सॅव्ही ग्राहकांना विमानतळावर सुलभ सेवा देईल.
या सुविधेचे उद्घाटन करताना एयर इंडियाच्या ग्लोबल एयरपोर्ट ऑपरेशन्स आणि ग्राउंड हँडलिंग विभागाचे प्रमुख डोनाल्ड हंटर म्हणाले, ‘प्रत्येक टचपॉइंवर ग्राहकांना मिळणारी सेवा उंचावण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. या सुविधेमुळे चेक- इन काउंटरवर प्रतीक्षा करण्याचा वेळ वाचतो व प्रवाशांना सहजपणे बोर्डिंग करता येते. आम्ही ही सुविधा आणखी भारतीय व जागतिक विमानतळांवर देण्याचे ध्येय ठेवले आहे.’ याप्रसंगी बीआयएएल, सीआयएसएफ आणि एयर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सेल्फ चेक इन आणि बॅजेग ड्रॉप सुविधेमुळे एयर इंडियाच्या प्रवाशांना बोर्डिंग पास पकिंवा बॅगेज टॅग प्रिंट करण्यापासून आणि आपले बॅगेज देण्यात आलेल्या स्लॉटवर आपोआप ड्रॉप करण्यापर्यंत सहज सुरळीत अनुभव मिळतो. या सुविधेमुळे चेक इन काउंटरवर प्रतीक्षा करावी लागत नाही. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल, शिवाय त्यांना प्रवासाचा सुखद अनुभव मिळतो. ग्राहकांना आता त्यांच्या पसंतीच्या सीट उपलब्धतेनुसार निवडणे, फ्रीक्वेंट फ्लायरचे तपशील अद्ययावत करणे आणि इतर सुविधांचा किऑस्कमध्येच लाभ घेता येईल.
पूर्वी एयर इंडियाने दिल्ली विमानतळावर टर्मिनल ३ येथे सेल्फ बॅगेज ड्रॉप आणि सेल्फ किऑस्क चेक- इन सेवा केवळ देशांतर्गंत आणि ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सुरू केली होती.