Party and Symbol : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल जाहीर

Ajit Pawar group got party and symbol : शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे. आता निवडणूक आयोगाने अजित पवारांचा मार्ग प्रशस्त केल्याने आता आमदार अपात्रता निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाण्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून उद्यापर्यंत (7 फेब्रुवारी) शरद पवार गटाला चिन्हाबाबत कळवण्यास सांगण्यात आलं आहे.

निवडणूक आयोगाने काय म्हटलं आहे?

अजित पवाराकंडील पक्ष खरा पक्ष आहे.

पक्ष आणि चिन्ह अजित पवार वापरतील

दोन खासदार अजित पवार गटाच्या बाजूने

5 आमदारांनी दोन्ही बाजूंनी पत्र दिलं

उद्या 7 फेब्रुवारीपर्यंत पक्षाचं नाव आणि चिन्ह सूचवावं

पक्षांतर्गत निवडणूक झाल्या नाहीत

अजित पवारांसोबत कोण?

– महाराष्ट्रातील 41आमदार

– नागालँडमधील 7आमदार

– झारखंड 1आमदार

– लोकसभा खासदार 2

– महाराष्ट्र विधानपरिषद 5

– राज्यसभा 1

शरद पवारांसोबत कोण?

महाराष्ट्रातील आमदार 15

केरळमधील आमदार 1

लोकसभा खासदार 4

महाराष्ट्र विधानपरिषद 4

राज्यसभा -3

पाच आमदारांनी व एका खासदाराने दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे

ही लोकशाहीची हत्या; अनिल देशमुखांचा आरोप

दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवडणूक आयोगाचा हा निर्णय म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले आहे.

एका बाजूला निकाल दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाची बैठक

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक निकालानंतर देवगिरीवर आज अजित पवार गटाची महत्वाची बैठक होत आहे. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक होत आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री,नेते आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. बैठकीत निकाल आणि पुढील रणनीती, राज्यसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीसह छगन भुजबळ यांच्या नाराजीवर देखील चर्चा होणार आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली थोड्याच वेळात देवगिरी बंगल्यावर बैठक सुरू होणार आहे.

Poonam Pandey Death Fake News : ‘पूनम तुझी लाज वाटते! केवळ प्रसिद्धीसाठी तू…’

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट

दरम्यान, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे आमदार अपात्रता निकाल 14 फेब्रुवारीला लागण्याची शक्यता आहे. निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या निकालात अजित पवार गट व शरद पवार गटाचे भवितव्य ठरणार आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना निकालाहून वेगळा निर्णय लागण्याची शक्यता आहे.

अंघोळ, ब्रश न करणाऱ्या पतीविरोधात महिलेची कोर्टात धाव; न्यायालयाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय

निर्णयाचे स्वागत करतो, बावनकुळेंची प्रतिक्रिया

दुसरीकडे, या निर्णयाचे स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

Husband Wife : नवऱ्याला जीवे मारण्यासाठी बायकोने केला होता खतरनाक प्लॅन, वेळीच झाली पोलखोल

शरद पवार गटासमोर मोठं आव्हान

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाने कायदेशीर लढाईसाठी फार कमी वेळ आहे. इतकेच नव्हे, तर कायदेशीर लढाई लढायची झाल्यास पक्ष आणि चिन्ह सुद्धा मिळणार नसल्याने मोठी रणनीती आखावी लागणार आहे. जे नाव आणि चिन्ह दिलं जाईल ते अत्यंत कमी कालावधीत लोकांपर्यंत पोहोचावावं लागणार आहे.

BIG NEWS : जनगणनेच्या बहाण्याने घरात घुसले अन् चाकूच्या धाकाने… अमरावती हादरलं

Crime : मधुचंद्राच्या रात्री पत्नीला कळले नवरा नपुसंक, ‘माझा मुलगा कामाचा नाही..’ म्हणत सासरा बेडरुममध्ये

आधी गोळ्या झाडल्या अन् मग… पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं? घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर