Nagpur Theft Case in Shantinagar: पितळी भांडे स्वच्छ करून देण्याच्या नावावर दोन चोरट्यांनी महिला व तिच्या सुनेचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (ता.८) दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
थरार : मित्राचा पाठलाग करून धारदार शस्त्राने डोक्यात सपासप 22 वार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५८ वर्षीय महिलेच्या घरी गुरुवारी दुपारच्या सुमारास दोघे जण आले. त्यांनी पितळी भांडे स्वच्छ करून देतो अशी बतावणी केली. महिलेने पितळी तांब्या स्वच्छ करण्याकरिता दिला. ते स्वच्छ करून देताच, त्यांनी आपल्या सुनेच्या पायातील चाळही स्वच्छ करण्यासाठी दिली.
अंघोळ, ब्रश न करणाऱ्या पतीविरोधात महिलेची कोर्टात धाव; न्यायालयाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय
ती स्वच्छ केल्यावर दोघांनी सोन्याचे दागिनेही स्वच्छ करून देतो असे सांगितले. महिलेने ७८ हजार ८४२ रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या पोत स्वच्छ करण्यासाठी त्यांच्याकडे दिल्या. दोघांनीही सुनेला हळद आणण्यास सांगितले. त्या आत गेल्यावर चोरट्यांनी महिलेचे दागिने डब्यात ठेवल्याचे भासविले आणि ते गॅसवर ठेवण्यास सांगून पसार झाले. दरम्यान सुनेने डबा उघडून बघितला असता, त्यात दागिने दिसले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे समजले.
Poonam Pandey Death Fake News : ‘पूनम तुझी लाज वाटते! केवळ प्रसिद्धीसाठी तू…’
Husband Wife : नवऱ्याला जीवे मारण्यासाठी बायकोने केला होता खतरनाक प्लॅन, वेळीच झाली पोलखोल
BIG NEWS : जनगणनेच्या बहाण्याने घरात घुसले अन् चाकूच्या धाकाने… अमरावती हादरलं
आधी गोळ्या झाडल्या अन् मग… पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं? घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर