मनसे नेते मा. अनिल शिदोरे यांच्या उपस्थितीत, फिटनेस मधील तरुणांचा मनसेमधे पक्ष प्रवेश

पुणे प्रतिनिधी –  मनसे नेते मा. अनिल शिदोरे यांच्या पुणे भेटी दरम्यान श्री. निलेश काळे यांच्या वाढदिसानिमित्त मनसेमधे असंख्य युवा तरुणांचा पक्ष प्रवेश झाला. त्यांनी पक्ष धोरणा बद्दल सर्वांना योग्य मार्गदर्शन केले. याप्रसंगी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्व सदस्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या वेळी उपस्थित मनसे चे श्री. समीर शिंदे, श्री. ललित भाऊ तिंडे व सन्मान चिन्हांचे मानकरी फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स पुणे चे श्री. दिलीप धुमाळ, आर्मस स्पोर्ट्स चे श्री. विवेक माने, बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस पुणे चे श्री. योगेश कांबळे, शरीर सौष्ठव पटू व सिनियर जज श्री. विनोद नायडू, पुणे प्रोटीन शॉप चे श्री. योगेश मोरे, स्वाभिमान संघटनेचे श्री. सुधीर भाऊ शिंदे, सरकारी वकील ॲड. अश्विनीताई सूरज जाधव, डॉ. ज्योती,  पुणे प्रहार तथा दै. आरंभ पर्व च्या  संपादीका सुरेखा मते, आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते व स्पोर्ट्स डायरेक्टर श्री. संजय गीते, उद्योजक श्री. देवा पवार, श्री. सचिन अडसूळ, शारीरीक शिक्षणाचे शिक्षक श्री. प्रवीण पोटे हे सर्व उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन अंकशास्त्र तज्ञ व अनुभवी फिटनेस कोच श्री. निलेश काळे व त्यांचे सहकारी दीपक टकले, निखिल नायडू, सूरज मोरे व पृथ्वीराज भागवत, बलकिशन चौहान यांनी केले होते.