पुणे, फेब्रुवारी २०२४: कुल फॅन्स (Kuhl Fans) या देशातील सर्वात मोठ्या प्युरिफायर्स ब्रॅण्डच्या अधिपत्याखालील कंपनीने पुण्यामध्ये कुल स्मार्ट व स्टायलिश फॅन्सची नवीन श्रेणी लाँच केली आहे. बीएलडीसी तंत्रज्ञानाचा वापर करत डिझाइन करण्यात आलेले हे पंखे आकर्षक व स्टायलिश असण्यासह ऊर्जा-कार्यक्षम देखील आहेत, जे वीज वापरामध्ये जवळपास ६५ टक्के बचत करतात.
आपला पोर्टफोलिओ विस्तारित करत कुल आता ऊर्जा-कार्यक्षम फॅन मॉडेल्सची विस्तारित श्रेणी देते. पुण्यातील लाँचमधून नवीन रिटेल पॉइण्ट्समध्ये नवीन श्रेणी उपलब्ध होते, तसेच कुल फॅन्स व्यापक प्रमाणात उपलब्ध असण्याची खात्री मिळते. या धोरणात्मक विस्तारीकरणासह कुलचा बाजारपेठेतील ऊर्जा-कार्यक्षम व नाविन्यपूर्ण सिलिंग फॅन सोलयूशन्सची प्रमुख प्रदाता म्हणून स्थान अधिक दृढ करण्याचा मनसुबा आहे.
६५ टक्के वीजेची बचत करण्यासह १०० टक्के मेड इन इंडिया
कुलने बीएलडीसी तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण नेक्स्ट-जेन डिसर्ट कूलर फॅन ‘कुल एक्सझेल’ लाँच केला. हा फ्लोअर-स्टॅण्डिंग डिसर्ट कूलर कम फॅन अल्ट्रासोनिक वॉटर मिस्टच्या माध्यमातून हवेमध्ये थंडावा पसरवतो, ज्यामुळे रूममधील तापमान जवळपास ५ अंश सेल्सिअसने कमी होते. तसेच, एक्सझेल डिसर्ट कूलर फॅन कोणताही आवाज न करता कार्यरत राहाते, ज्यामुळे रात्रीच्या वेळी शांतमय झोपेची खात्री मिळते. या पंख्यामधील ऑस्किलेशन वैशिष्ट्य आणि १२ तासांपर्यंत टिकणाऱ्या इंटर्नल वॉटर टँकसह हा पंखा तुमच्या घरामधील आवाज करणाऱ्या व पारंपारिक डिसर्ट कूलर्सच्या जागी योग्य रिप्लेसमेंट आहे. या पंख्याची सुरूवातीची किंमत ८९९० रूपये आहे.
कुल फॅन्सने आणखी एक नाविन्यपूर्ण डिवाईस ‘कुल वॉईस कंट्रोलर’ देखील लाँच केले, जे पंख्यांसाठी अद्वितीय वॉईस-आधारित कंट्रोलर आहे. हा डिवाईस सहजपणे इलेक्ट्रिकल सॉकेटमध्ये प्लग करता येतो आणि वापरकर्त्यांना त्यांच्या आवाजासह कुल पंखे प्रभावीपणे नियंत्रित करण्याची सुविधा देतो. वापरकर्ते पंखा ऑन/ऑफ करण्यासह गुंतागुंतीची कार्यसंचालने देखील करू शकतात, जसे गतीवर नियंत्रण ठेवणे आणि त्यांचा आवाजाचा उपयोग करत डाऊनलाइटवर नियंत्रण ठेवणे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या डिवाईसला कार्यरत राहण्यासाठी इंटरनेअ कनेक्शनची गरज नाही. हा प्लग-अँड-प्ले डिवाईस कुल पंख्यांवर नियंत्रण इेवण्यासह तुमच्या तुमच्या बेडरूममधील बेडवरून आरामशीरपणे सव्र अप्लायन्सेस ऑपरेट करण्याची सुविधा देखील देतो. रात्रीच्या वेळी आराम करताना बेडवरून उठवण्याची किंवा रिमोटचा शोध घेण्याची गरज भासत नाही. हा नाविन्यपूर्ण डिवाईस प्रिमिअम कुल पंख्यांसह मोफत येतो आणि स्वतंत्रपणे फक्त १९९९ रूपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.
कुलने भारतातील पंख्यांची पहिली १०० टक्के मेड इन इंडिया बीएलडीसी वॉल व पेडेस्टल श्रेणी ‘कुल इन्स्पायरा सिरीज’ देखील लाँच केली आहे. हे नाविन्यपूर्ण वॉल व पेडेस्टल पंखे ६५ टक्के वीजेची बचत करतात आणि कमी आवाजासह कार्यरत राहतात. कुल इन्स्पायरा सिरीज टीपीडब्ल्यू श्रेणीमध्ये ५-ब्लेड फॅन्ससह ड्युअल कंट्रोल पर्याय – टचस्क्रिन आणि रिमोटच्या माध्यमातून आहे. या पंख्यांचे उल्लेखनीय वैशिष्ट्य महणजे इलेक्ट्रॉनिक स्विंग कंट्रोल. हे अत्यावश्यक वैशिष्ट्य वापरकर्त्यांना बटनाच्या टचसह स्विंग किंवा ऑस्किलेशन फंक्शन सहजपणे ऑन/ऑफ करण्याची सुविधा देते. कुल इन्स्पायरा फॅन्ससाठी सुरूवातीची किंमत ३९९९ रूपये इतक्या कमी किमतीपासून सुरू होते.
तसे, कुल गॅलॅक्सीज सिरीज लाँच करण्यात आली आहे, जी मोठ्या स्पेसेसची पूर्तता करते. या सिरीजमधील सिलिंग फॅन्स ५५ इंच ते ६८ इंचपर्यंतच्या व्यासामध्ये उपलब्ध आहेत. हे पंखे जवळपास सायलेण्ट १०० आरपीएममध्ये कार्यरत राहतात आणि २८० सीएमएमची उद्योग-अग्रणी एअर डिलिव्हरी देतात. स्मार्ट तंत्रज्ञानासह सुसज्ज हे पंखे आयओटी-सक्षम आहेत, ज्यामुळे मोबाइल फोन्स किंवा अॅमेझॉन अॅलेक्सा/गुगल होम डिवाईसेसच्या माध्यमातून सोईस्करपणे कार्यरत राहू शकतात. याव्यतिरिक्त, या नाविन्यपूर्ण पंख्यामध्ये बिल्ट-इन डाऊनलाइट आहे, जी विविध रंगसंगती देते. प्रिमिअम कुल गॅलॅक्सीज श्रेणीची किंमत १३,९९० रूपयांपासून सुरू होते.
किफायतशीर दरांमध्ये स्टायलिश पंख्यांचा शोध घेणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीने सिलिंग फॅन्सची नवीन कुल आर्क्टिस सिरीज लाँच केली आहे. या स्लीक व स्लिम पंख्यांमध्ये कॉम्पॅक्ट मोटर आहे आणि विविध रंगांमध्ये येतात. कुल आर्क्टिस सिरीज श्रेणीची किंमत फक्त २६९९ रूपयांपासून सुरू होते.
कुल बीएलडीसी फॅन्समध्ये स्टायलिश व नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांची श्रेणी समाविष्ट आहे, जी या पंख्यांना अधिक हवेहवेसे बनवते. हे पंखे वाय-फाय व आयओटी-सक्षम आहेत, ज्यामुळे स्मार्टफोन, अॅलेकसा किंवा वॉईस कमांड्सच्या माध्यमातून दुरून नियंत्रण ठेवता येऊ शकते. तसेच, या पंख्यांमध्ये रिव्हर्स फंक्शन आहे, जी संपूर्ण रूममध्ये थंडगार हवा प्रसारित करते, ज्यामुळे सर्व ऋत्तूंसाठी व्यावहारिक निवड आहेत. याव्यतिरिक्त, कुल पंखे विना आवाजामध्ये अधिक एअरफ्लो वितरित करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत, ज्यामुळे निवासी व व्यावसायिक रचनांमधील आधुनिक आर्किटेक्चरल व इंटीरिअर प्रकल्पांसाठी परिपूर्ण आहेत. या अद्वितीय वैशिष्ट्यांसह कुल पंखे कार्यक्षमपणे वीज वापर कमी करतात, तसेच कोणत्याही स्पेसची आकर्षकता व आरामदायीपणामध्ये वाढ करतात.
मीडिया कॉन्फरन्समध्ये संवाद साधताना केण्ट आरओ सिस्टम्स लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. वरूण गुप्ता म्हणाले, ”आम्हाला पुण्यामध्ये कुल स्टायलिश फॅन्सची नवीन श्रेणी लाँच करण्याचा अभिमान वाटतो. ही श्रेणी ऊर्जा, पर्यावरण व तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणाऱ्या आमच्या ब्रॅण्ड तत्त्वाशी संलग्न आहे. वाढते तापमान आणि ऊर्जा संवर्धनाची गरज पाहता आमचा विश्वास आहे की प्रांतामध्ये या पंख्यांसाठी उच्च मागणी असेल. उल्लेखनीय बाब म्हणजे विशिष्ट इंडक्शन पंखा जवळपास ८० वॅट वीजेचा वापर करतो, तर कुल बीएलडीसी पंखा फुल स्पीडमध्ये फक्त २८ वॅट वीजेचा वापर करतो. याचा अर्थ असा की कुल बीएलडीसी पंखे जवळपास ६५ टक्के वीजेची बचत करू शकतात.”
श्री. गुप्ता पुढे म्हणाले, ”गेल्या वर्षी भारतातील सिलिंग फॅन बाजारपेठेत प्रवेश केलेल्या कुलने स्मार्ट व स्टायलिश पंख्यांच्या प्रिमिअम श्रेणीसह कार्यसंचालनांच्या पहिल्या वर्षात उत्तम कामगिरी केली आहे. खरेतर, ब्रॅण्डकडे भारतातील उच्च-स्तरीय प्रिमिअम पंख्यांची सर्वात मोठी श्रेणी आहे आणि आता देशातील मास प्रिमिअम श्रेणीमध्ये प्रभुत्व स्थापित करण्यास सज्ज आहे. सुरूवातीच्या ऑफरिंग्जना मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामधून प्रेरणा घेत ब्रॅण्ड आपला उत्पादन पोर्टफोलिओ विस्तारित करत आहे आणि नवीन प्रदेशांमध्ये प्रवेश करत आहे. या उत्साहवर्धक परिवर्तनामध्ये सिलिंग फॅन्ससाठी महत्त्वपूर्ण बाजारपेठ पुणेचा देखील समावेश आहे. यामधून देशभरातील उद्योगामध्ये अग्रणी बनण्याप्रती कुलची कटिबद्धता दिसून येते.”
”आम्ही ग्राहकांसाठी उत्पादनांची सर्वोत्तम श्रेणी सादर करण्याकरिता आरअँडडीमध्ये सतत गुंतवणूक करत आहोत. १ वर्षाच्या कालावधीत आम्ही लक्षणीय प्रयत्न केले आहेत आणि ग्राहकांना दाखवून दिले आहे की आमचे जागतिक दर्जाचे इंजीनिअर्स व अत्याधुनिक उत्पादन केंद्र भारतीय ग्राहकांसाठी पंख्यांची सर्वात इच्छित व आकर्षक श्रेणी डिझाइन करत आहेत. सर्व कुल पंख्यांना बीईईकडून ५-स्टार रेटिंग मिळाले आहे आणि बीआयएस प्रमाणित आहेत,” असे श्री. गुप्ता म्हणाले.
कुल पंखे १०० टक्के मेड इन इंडिया असून कुलच्या आरअँडडी टीमने डिझाइन केले आहेत आणि विशिष्ट इंडक्शन मोटर्सच्या तुलनेत दीर्घकाळापर्यंत टिकाऊपणाची खात्री देतात. आपल्या भविष्यकालीन दृष्टिकोनाचा भाग म्हणून कुलचा आपल्या पंख्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये घेऊन जाण्याचा, तसेच ‘मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड’ संकल्पनेप्रती मोठ्या प्रमाणात योगदान देण्याचा मनसुबा आहे.