Suicide : शेवटी तिने टोकाचा निर्णय घेतलाच…पतीवर जीवापाड प्रेम करणार्‍या पत्नीची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

नाशिक । जीवापाड प्रेम करणार्‍या पतीच्या उपचारासाठी भुसावळ येथून नाशिकमध्ये येत ‘डी मार्ट’मध्ये नोकरी करणार्‍या २६ वर्षीय विवाहितेने  (Suicide)आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. विवाहितेने इंदिरानगरमध्ये भाडेतत्वावर घेतलेल्या फ्लॅटमध्ये गळफास केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Lasya Nanditha : महिला आमदाराचा अपघातात जागीच मृत्यू

पूजा आनंद शिरसाठ (वय २६, रा. नकुल, गल्ली नंबर ५, पांडवनगरी, इंदिरानगर) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पूजा शिरसाठ यांचा पती आनंद शिरसाठ यांचा काही महिन्यांपूर्वी भुसावळ (जि. जळगाव) येथे रस्ते अपघात झाला. दरम्यान, त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते अंथरुणाला खिळून आहेत. त्यामुळे पतीला जगविण्यासाठी पूजा शिरसाठ वर्षभरापासून भुसावळ येथून नाशकात कामाच्या शोधार्थ आली होती.

Journalist : पत्रकारांना धमकी देणाऱ्यास होणार ५० हजार दंड व ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास

ती भाडेतत्वावर घर घेऊन नाशिक शहरात राहत होती. तिने सिडको भागातील ‘डी मार्ट’ शो रुममध्ये काम सुरु केले. ती पगाराचे पैसे पती आनंद शिरसाठ यांच्या उपचारासाठी पाठवित होती. उर्वरीत पगारातून ती उदरनिर्वाह करत होती. तरीही, तिची आर्थिक परिस्थिती सुधारात नव्हती. दिवसेंदिवस खर्च वाढत होता.

त्यातून होणारा त्रास तिला असह्य झाला. शेवटी तिने टोकाचा निर्णय घेत बुधवारी (दि. २१) दुपारी चार वाजेपूर्वी भाड्याच्या घरातील किचन रूममध्ये गळफास घेतला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार किशोर खरोटे करत आहेत.