Crime News : अंगणवाडीत नोकरी देण्याच्या बहाण्याने 20 महिलांवर अत्याचार; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Crime News : राजस्थानमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात सिरोही नगरपरिषदचे अध्यक्ष महेंद्रा मेवडा आणि माजी नगरपरिषद आयुक्त महेंद्रा चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगणवाडीमध्ये काम देतो असं सांगून जवळपास २० महिलांवर बलात्कार केल्याचा या दोघांवर आरोप आहे.

थरार : मित्राचा पाठलाग करून धारदार शस्त्राने डोक्यात सपासप 22 वार

पाली जिल्ह्यातील एका महिलेने पोलीस स्टेशन गाठल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. महिलेने दावा केलाय की नोकरीचे प्रलोभन देऊन महेंद्र मेवडा आणि महेंद्रा चौधरी यांनी तिच्यावर आणि इतर जवळपास २० महिलांवर बलात्कार केला आहे. महिलेने असाही दावा केलाय की, आरोपींनी लैंगिक अत्याचाराचा व्हिडिओ शूट केला होता. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी देखील करण्यात आली होती.

अंघोळ, ब्रश न करणाऱ्या पतीविरोधात महिलेची कोर्टात धाव; न्यायालयाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय

आरोपींनी बदनामी करण्याची धमकी देत महिलांकडे प्रत्येकी ५ लाखांची मागणी केल्याचा दावा देखील करण्यात आलाय. तक्रारीनुसार, तक्रारदार महिला आणि अन्य महिला काही महिन्यांपूर्वी सिरोही जिल्ह्यात अंगणवाडीमध्ये काम करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना राहण्याची आणि जेवणाची सोय करणाऱ्या व्यक्तींनी अत्याचार केल्याचा आरोप आहे.

Poonam Pandey Death Fake News : ‘पूनम तुझी लाज वाटते! केवळ प्रसिद्धीसाठी तू…’

महिलांना देण्यात येणाऱ्या जेवणामध्ये काही तरी टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला. शुद्धीवर आल्यानंतर आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती, असा दावा महिलेकडून करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक पारस चौधरी म्हणाले की, महिलेने यापूर्वी एक खोटी तक्रार दाखल केली होती. मात्र, आठ महिलांच्या याचिकेनंतर राजस्थान हाय कोर्टाने तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले होते.

Husband Wife : नवऱ्याला जीवे मारण्यासाठी बायकोने केला होता खतरनाक प्लॅन, वेळीच झाली पोलखोल

BIG NEWS : जनगणनेच्या बहाण्याने घरात घुसले अन् चाकूच्या धाकाने… अमरावती हादरलं

Crime : मधुचंद्राच्या रात्री पत्नीला कळले नवरा नपुसंक, ‘माझा मुलगा कामाचा नाही..’ म्हणत सासरा बेडरुममध्ये

आधी गोळ्या झाडल्या अन् मग… पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं? घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर