Shiv Sena Mla Disqualification Decision
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने खूप मोठा निकाल जाहीर केला आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्षच हा मूळ शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे बहुमत आहे, असा निकाल राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलाय. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना हा खूप मोठा झटका बसला आहे. आता ठाकरे गटाची पुन्हा खरी कायदेशीर लढाई सुरु होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांनी आजच्या निकाल वाचनात ठाकरे गटाला अनेक धक्क्यावर धक्के दिले.
Vivo X100 Series : विवो एक्स १०० सीरिज भारतात लॉन्च; कॅमेरा क्वालिटीत आयफोनपेक्षा वरचढ
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाचं वाचन केलं. या निकालात शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्र मान्य केलेले नाहीत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उलट तपासणीला आले नाहीत म्हणून ठाकरे गटाचं प्रतिज्ञापत्र मान्य धरण्यात आलं नाही. तसेच राहुल नार्वेकर यांनी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली घटना दुरुस्ती मान्य केली. उद्धव ठाकरे यांनी 2018 मध्ये केलेली घटना दुरुस्ती ही अयोग्य होती, असं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं आहे.
Shiv Sena Mla Disqualification Decision
तसेच निवडणूक आयोगाकडे 1999 मध्ये घटनेत केलेले बदल बरोबर आहेत. त्यामुळं त्यावेळची घटना वैध. पण 2018 मध्ये करण्यात आलेले बदल वैध नाही, असं राहुल नार्वेकर म्हणाले. विशेष म्हणजे राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांना पक्षातून हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही, असं निरीक्षण नोंदवलं.
पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाहीत. पक्षप्रमुख नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम असणार आहे. उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय कार्यकारिणीचा पाठिंबा नव्हता. शिवसेना पक्षप्रमुख कुणालाही पदावरुन काढू शकत नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरुन काढू शकत नाहीत. असं झालं तर पक्षातला कुणीच पक्षप्रमुखाविरोधात बोलू शकणार नाही. पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीला घातक आहे. नाहीतर पक्षातील छोटे घटक काहीच बोलू शकणार नाहीत.
Shiv Sena Mla Disqualification Decision
ठाकरेंनी शिंदेंची केलेली हकालपट्टी मान्य करता येणार नाही. शिंदेंना पक्षातून काढण्याचे अधिकार एकट्या ठाकरेंना नाही. उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय ग्राह्य धरता येणार नाही. पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाहीत, असं म्हणत विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाचा दावा फेटाळला.