Royal Enfield : रॉयल एनफिल्डच्या ३ बाईकसाठी ग्राहकांची झुंबड, डिसेंबर २०२३ मध्ये ७,९८६ युनिटची विक्री

Royal Enfield Bikes Details in Marathi : रॉयल एनफिल्डचा दुचाकी बाजारात वेगळा प्रभाव आहे. रॉयल एनफिल्ड दुचाकीबाबत तरुणांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. कंपनीच्या ६५० सीसी इंजिन सेगमेंटमध्ये अनेक पर्याय आहेत. कंपनीने डिसेंबर २०२३ मध्ये ३५० सीसी ते ६५० इंजिनच्या एकूण ७ हजार ९८६ दुचाकी विकल्या गेल्या. तर, २०२२ मध्ये ही संख्या ७ हजार १७७ होती.

रॉयल एनफिल्ड हिमालयन : रॉयल एनफिल्ड हिमालयन ही एक एडवेंचर दुचाकी आहे. ही दुचाकी एकूण सहा रंगाच्या पर्यायसह उपलब्ध आहे. या दुचाकीमध्ये ४११ सीसी इंजिन मिळते. तर, १५ लीटरची मोठी इंधन टाकी देण्यात आली आहे. रॉयल एनफिल्ड हिमालयन ३१ किलोमीटरपर्यंत मायलेज देते, असा कंपनीचा दावा केला. रॉयल एनफिल्ड हिमालयन ६ हजार ५०० आरपीएमवर २४.३ बीपीएच पॉवर जनरेट करते. या दुचाकीच्या सीटची उंची ८०० मिमी आहे. रॉयल एनफिल्ड हिमालयनची एक्स शोरूम किंमत २.६२ लाख रुपये इतकी आहे. या दुचाकीचे चार मॉडेलची बाजारात विक्री केली जात आहे.

husband-wife : पतीने पत्नीला लॉजवर रंगेहात पकडले; रूमचा दरवाजा तोडला, पत्नी प्रियकराबरोबर नको त्या अवस्थेत सापडली

रॉयल एनफिल्ड सुपर मेटियर ६५० : मस्क्युलर लूक असलेल्या या दुचाकीचे वजन २४१ किलो आहे. ही दुचाकी शक्तिशाली ६४८ सीसी इंजिनसह येते. रॉयल एनफिल्ड सुपर मेटियर ६५० ची इंधन क्षमता १५.७ लीटर आहे. ही दुचाकी एका लीटरमध्ये २३.७ किलोमीटर मायलेज देते. या दुचाकीत ६ गिअरबॉक्स आणि सीटची उंची ७४० मिमी आहे. या दुचाकीच्या बेस मॉडेलची एक्स- शोरूम किंमत ४.२२ लाख रुपये आहे. या दुचाकीची फ्युएल टँक आणि स्प्लिट सीट स्टाइलमुळे ती इतर दुचाकीपेक्षा वेगळी आहे.

#Fake Compalint : तुमच्याविरोधात कुणी खोटी पोलीस तक्रार केली तर काय कराल?; घाबरण्यापेक्षा हे वाचा

रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर ६५० : रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर ६५० दुचाकी ७ रंगात बाजारात उपलब्ध आहे. या दुचाकीची इंधन टाकी १३.७ लीटर क्षमतेची आहे. रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर ६५० मध्ये ६४८ सीसी शक्तिशाली इंजिन आहे. ही दुचाकी एका लीटरमध्ये २३ किलोमीटरचे अंतर कापते. या दुचाकीची सुरुवाती एक्स शोरुम किंमत ३.५९ लाख इतकी आहे. या दुचाकीच्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत ३.९१ लाख इतकी आहे. ही एक क्रूझ दुचाकी आहे, जी चार वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली.