#Politics : शिंदे गटाचे 7 खासदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा काँग्रेस नेत्याने दावा केला आहे. आमदार अपात्र प्रकरणावर 10 जानेवारी पर्यंत निकाल येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी झाली. विधानसभा अध्यक्षांनी निकाल राखून ठेवला आहे. निकाला आल्यानंतर मोठ्या घडामोडी घडतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
2024 मध्ये लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडी व भाजपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अशातच काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी खळबळजनक दावा केला आहे. शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी खळबळजनक दावा केला आहे. काँग्रेसचे नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा सामंत यांनी केला आहे.
#Whatsapp : आता फुकटात नाही वापरता येणार Whatsapp फीचर, 2024 मध्ये द्यावे लागणार पैसे
हेही वाचा राम मंदिर सोहळ्यानंतर किंवा आधी महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड घडणार?
सतेज पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे शिंदे गटात खळबळ उडाली आहे. सतेज पाटील म्हणाले की, अद्याप कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांची नावे अंतिम नाही. शिंदे गटाच्या 7 खासदारांनी भाजपाला लेखी कळवलं आहे की आम्हाला भाजपाच्या कमळ चिन्हावर लढायचे आहे अशी माझी माहिती आहे. 10 तारखेला आमदारांचा निर्णय काय होतो यावर पुढचे राजकारण अवलंबून असणार आहे. त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत सर्व काही चित्र स्पष्ट होईल असा दावा त्यांनी केला आहे.
तसेच राज्यात लोक मतदानाची वाट पाहत आहेत. लोकांना संधी हवी. महाविकास आघाडीला राज्यात बहुमत मिळेल असा अंदाज आहे. केंद्र सरकारनं जी विकसित भारत यात्रा काढली त्याला राजकीय पक्षांनी विरोध करण्याऐवजी जनतेने विरोध केला. हे सगळे खोटे आहे असं लोक म्हणतायेत. त्यामुळे जनता महाविकास आघाडीला मतदान करेल अशी आम्हाला खात्री आहे असं सतेज पाटील यांनी म्हटलं.
काँग्रेसचे 8-9 नेते हे भाजपाच्या संपर्कात आहे. त्यांची अधिकृत यादी माझ्याकडे आहे. मी जाहीर करेन. सतेज पाटलांकडे जशी यादी आहे तशी माझ्याकडेही 9 जणांची यादी आहे. कोण कुठे भेटले, कोण कुठे मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले हे सगळे मला माहिती आहे असं सांगत मंत्री उदय सामंत यांनी सतेज पाटलांच्या दाव्यावर प्रतिदावा केला आहे.