क्रिकेटच्या मैदानात घडला “नको तो” चावटपणा, दृश्य कॅमेरात कैद झाले हे कळताच जोडप्यांनी काढला पळ!

पाकिस्तानचा संघ फलंदाजी करत होता. इतक्यातच कॅमेरा मॅन चे लक्ष एका जोडप्याकडे गेले आणि हे जोडपे करत असलेल्या चावटपणाचा सर्व नजारा कॅमेरा मध्ये कैद झाला.

क्रिकेटचा सामना पाहत असताना क्रिकेट स्टेडियम मधील प्रत्येक चहात्याला असं वाटतं की स्क्रीनवर आपण देखील दिसायला हवे. एकदा तरी कॅमेरा मन चा फोकस आपल्यावर आला पाहिजे आणि म्हणूनच लोक अनेकदा क्रिकेट सामन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करून येतात आणि अशावेळी जर आपल्याला स्क्रीनवर दिसण्याची संधी मिळाली तर या चाहत्यांचा आनंद गगनात मावत नाही. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वर देखील अशीच एक घटना घडलेली आहे. तेथे एका जोडप्याचे रोमान्स करत असतानाचे दृश्य थेट क्रिकेट सामना सुरू असलेल्या स्क्रीनवर पाहायला मिळाले आणि त्यानंतर जे घडले ते आश्चर्य करणारे होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील होत आहे.

UPI QR कोडला रामराम; आता नवीन सेवेला सुरूवात; जाणून घ्या महत्वाची माहिती

क्रिकेटच्या सामना सुरू असतानाच अचानक कॅमेरामनचे लक्ष एका जोडप्याकडे गेले आणि ते जोडपे नको तो चावटपणा करत होते. मुलगा त्याच्या मांडीवर टी-शर्ट घेऊन बसलेला होता आणि मुलगी त्याच्याकडे थोडीशी झुकलेली होती आणि अचानक हे सारे दृश्य स्क्रीनवर दिसले. हा प्रसंग पाहिल्यानंतर दोघांनाही धक्का बसला आणि मुलाने ताबडतोब स्वतःचा चेहरा जवळ असलेल्या टी-शर्टच्या मदतीने झाकला आणि तिथून दोघेही पळाले. हे सारे घडत असताना सगळ्यांच्या नजरा मात्र थक्क झाल्या. कॅमेरामनला देखील स्वतःच्या भावना रोखता आल्या नाही आणि घडलेला प्रसंग हा चर्चेचा विषय बनला.

cricket1

या दृश्याचा व्हिडिओ लगेचच सोशल मीडियावर वायरल देखील झाला आणि त्यानंतर जे घडायला नको होते नेमके तेच झाले. या जोडप्याबद्दल लोकांकडून समिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. अनेकांनी या व्हिडिओची मजा घेतली तर काहींनी संताप देखील व्यक्त केला, अशा प्रकारे कॅमेऱ्यांच्या आगाऊपणामुळे जोडप्यांना रोमांस करता आला नाही अश्या काही कमेंट देखील या व्हिडिओ खाली वाचायला मिळाल्या.