चालत्या बाईकवर जोडप्यांनी केला कहर, प्रेयसीला चक्क टाकीवर बसवून… व्हिडिओ पाहाल तर….

प्रवास करत असताना आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडतात, ज्या पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसत असतो अशावेळी कौतुक करावे की त्यांना फटके द्यावे हेच कधी कधी कळत नाही. अशीच एक घटना नुकतीच घडलेली आहे. एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीला चक्क बाईकच्या टाकीवर बसवले आहे आणि तो रोमान्स करत आहेत हे सारे करत असताना त्याने वाहतुकीचे कोणतेच नियम पाळले नाहीत. बाईक चालवत असताना सुरक्षितेचे नियम म्हणून हेल्मेट देखील घातलेले नाही.

क्रिकेटच्या मैदानात घडला “नको तो” चावटपणा, दृश्य कॅमेरात कैद झाले हे कळताच जोडप्यांनी काढला पळ!

चालत्या बाईकवर रोमान्स करणे हे सध्याच्या तरुण पिढीसाठी सर्वसाधारण गोष्ट झालेली आहे. या संदर्भातील अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर देखील पाहत असतो परंतु नुकताच एक व्हिडिओ जो समोर आलेला आहे त्या व्हिडिओमध्ये या जोडप्याने प्रेमाच्या सर्व सीमाच पार केलेल्या आहेत. हे कपल अक्षरशः बाईकवर रोमान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये हे कपल भरधाव वेगेमध्ये बाईक तर चालवत आहे परंतु बाईक चालवत असताना त्यांनी त्याच्या प्रेयसी सोबत केलेल्या गोष्टी देखील लज्जास्पद दिसत आहेत. या सर्व गोष्टी कारमध्ये बसलेल्या व्यक्तीने कॅमेरात कैद करून सोशल मीडियावर अपलोड केलेल्या आहेत. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील हापुर नॅशनल हायवे NH9 चा आहे, असे देखील म्हटले जात आहे.

UPI QR कोडला रामराम; आता नवीन सेवेला सुरूवात; जाणून घ्या महत्वाची माहिती

या जोडप्याने अक्षरशः बाईकवर बसल्यानंतर वाहतुकीचे नियम देखील धाब्यावर बसवलेले आहे. बाईक चालवताना या मुलाने हेल्मेट देखील घातलेली नाहीये तसेच ही व्यक्ती बाईक देखील भरधाव वेगेमध्ये धावत चालवत आहे त्याची प्रेयसी त्याला घट्ट मिठी मारून बसलेली आहे आणि ही प्रेयसी मुलाच्या मागे नाही तर चक्क बाईकच्या पेट्रोल टाकीवर बसलेली दिसून येत आहे.

या मुलाने वाहतूक नियमाचे तीन तेरा वाजवले तर आहे पण त्याचबरोबर सुरक्षा म्हणून हेल्मेट देखील घातले नाही आणि म्हणूनच नेटकरी वाहतूक नियमांचा उल्लंघन केल्याचा आरोप देखील त्याच्यावर करत आहे. या व्हिडिओमधील जोडप्यावर कडक कारवाई करावी असे देखील नेटकरी म्हणत आहेत आणि या व्हिडिओची दखल वाहतूक शाखेने देखील घेतलेले आहे

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेऊन योग्य ती कारवाई देखील केलेली आहे. हा घडलेला प्रकार प्रामुख्याने सिंभावली पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 9 वर घडलेला आहे आणि म्हणूनच या व्हिडिओतील जोडप्याला पोलिसांनी आठ हजार रुपयांचा दंड ठोटवला आहे त्यानंतर योग्य ती कारवाई देखील त्याच्यावर करण्यात आली आहे अशी माहिती देखील पोलिसांनी नेटकऱ्यांना दिली आहे. या पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे नक्कीच भविष्यात जोडप्यांद्वारे केलेल्या अश्लील कृत्याला आळा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा प्रकारच्या व्हिडिओमुळे भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता जास्त असते म्हणूनच प्रवास करत असताना वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. नाहीतर जीवावर देखील बेतू शकते याची देखील काळजी नागरिकांनी घ्यावी असे देखील पोलिसांकडून नागरिकांना सांगण्यात आलेले आहे.