पुणे : ( विलास गुरव) श्री सिद्धिविनायक भजनी मंडळ कोथरूड, पुणे व शिवज्योत मित्र मंडळ पांगारी (गिजेवाडी) आयोजित बहुरंगी नमन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे.
कोकणवासियांत प्रसिध्द असलेले पारंपारिक नमन कामानिमित्त पुणे येथे स्थिरावलेल्या चाकरमान्यांसाठी व पुणेकरांसाठी आयोजित करण्यात आले असून याचे आयोजन श्री सिद्धिविनायक भजनी मंडळ कोथरूड, पुणे व शिवज्योत मित्र मंडळ पांगारी (गिजेवाडी) मार्फत करण्यात आले आहे. याचे सादरीकरण वाघजाई दुर्गा माता नाट्य नमन मंडळ, काटवली (वरची वाडी)ता.संगमेश्वर जि. रत्नागिरी करणार आहेत.
हा कार्यक्रम सोमवार (दि. १५) रोजी रात्री ठीक ९ वाजता बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर, पुणे येथे होणार आहे. यामध्ये पौराणिक गण सादर करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाची तिकीट विक्री सुरू असून यासंदर्भात दीपक सोलकर संपर्क- 9970414085, प्रकाश कानसे, रवींद्र डावल, योगेश धाडवे, दिनेश गिजे, राजेश सोलकर, मंगेश भुवड, योगेश भुरवणे, संजय सावंत, दीपक माईन,सतीश जोशी, प्रथमेश कापले,केतन दोरकडे ,रुपेश भुरवणे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यावेळी विक्री झालेल्या तिकीटांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार असून पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे पैठणी, भिंतीवरील घड्याळ व इस्त्री बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.