पुणे : सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारताकरीता तरुणाईने पुढाकार घ्यावा, याकरीता पुण्यामध्ये सातव्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट तर्फे रविवार, दिनांक २८ व सोमवार, दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी संस्थेच्या सभागृहात ही संसद होणार आहे. यामध्ये देशभरातील राजकारण, समाजकारण आणि विविध विषयांतील तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी महाराष्ट्रातील तरुणांना मिळणार आहे, अशी माहिती इन्स्टिटयूटचे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी संसदेत सहभागी होणार आहेत. राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा विविध विषयांवर संसदेत चर्चा होणार आहे.यामध्ये विविध राजकीय पक्ष राजकीय विश्लेषक घटना तज्ञ राजकारण व युवकांचे संबंधित सखोल ज्ञान या युवा संसदमध्ये मिळणार आहे. वय वर्षे १६ ते ४० मधील तरुणांनी संसदेत सहभाग घ्यावा. संसदेत सहभागी होण्याकरीता मोफत प्रवेश असून विद्यार्थीनींची एक दिवसाची पुण्यामध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात येणार आहे. अशी माहिती हीं त्यानी दिली आहॆ.
विद्यार्थ्यांनी संसदेतील सहभागाकरीता मो. ९०७५३४४२७६ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि https://forms.gle/ky3EmkTW8np7mwwT9 या लिंकवरून फॉर्म भरावा. त्यानुसार विद्यार्थ्यांची नोंदणी होत आहे.
ह्यां युवा संसद कार्यक्रमासाठी विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम ताई गोरे शिवसेना नेते खासदार संजय राऊत खासदार अशोक नेते खासदार संजय जाधव खासदार राजेंद्र गावित खासदार हेमंत पाटील खासदार ओमराजे निंबाळकर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर माजी मंत्री अनिल देशमुख माजी मंत्री हर्षवर्धन पाटील माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आमदार श्री भास्करराव जाधव आमदार संजय शिरसाट मा आमदार शिवाजी कर्डिले मा. आमदार सुधीर तांबे राष्ट्रीय भाजप सचिव सुनील देवधर पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे पुणे मनपाचे नगरसेवक हेमंत रसने गणेश बिडकर साईनाथ बाबर माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड प्रसिद्ध घटना तज्ञ डॉक्टर उल्हास बापट ज्येष्ठ राजकीय विश्लेषक मा श्री हेमंत देसाई प्रसिद्धेश्वर माननीय श्री नितीन बानगुडे पाटील ज्येष्ठ अधिवक्ते एडवोकेट असीम सरोदे वरिष्ठ पत्रकार निलेश बुधावळे मुंबईतक संपादक साहिल जोशी उद्योजक सनी निम्हण काँग्रेस मीडिया प्रमुख अक्षय आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील व सरपंच दिलीप घोलप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.