८ व्या ब्रम्हपुत्रा खोरे चित्रपट महोत्सवामध्ये कूकी या हिंदी चित्रपटाने प्रारंभ

पुणे : ८ व्या ब्रम्हपुत्रा खोरे चित्रपट महोत्सवाला गुवाहाटीमधल्या ज्योती चित्रबन इथे प्रारंभ झाला. महोत्सवाची सुरुवात ‘कूकी’ या निर्माते डॉ. जुन्मोनी देवी खोऊंड व दिग्दर्शक प्रणव जे डेका यांच्या पहिल्या हिंदी चित्रपटाने झाली. निरी मिडीया ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा हा चित्रपट आहे.

डॉ. जुन्मोनी देवी खोऊंड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘कूकी’ या चित्रपटात, आसामी नसलेल्या एका मुलीचा जीवन संघर्ष, प्रेमकथा आणि त्यात येणाऱ्या अनेक अडचणी यांची कथा आहे. या चित्रपटातून आसामी संस्कृतीचे विविध पैलू पाहायला मिळतात.

BIG NEWS | मुलांच्या शाळांची वेळ बदलली, आता या वेळेत भरणार शाळा

हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते राजेश तेलंग, दीपानीता सरमा, देवोलिना भट्टाचार्य, बोधीसत्व सरमा यांच्यासह आसामी अभिनेते कमल लोचन, विभूती भूषण हजारिका, प्रीती कंग्कना, रणजीव लाल बोरा यांनी या चित्रपटात अभिनय केला आहे.

‘कूकी’ चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री रितीशा खोऊंड हिच्या या धाडसी आणि आव्हानात्मक भूमिकेतील अभिनय कौशल्याचे महोत्सावात उपस्थित प्रेक्षकांनी कौतुक केले. ‘इल्लिगल’ या लोकप्रिय वेबसिरीजमधल्या ‘जॅक’ या भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेली रितीशा; येत्या काही वर्षात चित्रपट क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी होईल, असा विश्वास अनेक कलाकारांनी व्यक्त केला.

महापालिका नोकर भरती : पात्र ३८८ उमेदवारांसाठी आमदार लांडगे सरसावले; अधिवेशनात मुद्दा मांडणार : महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन

निर्मात्या डॉ. जुन्मोनी देवी खोऊंड यांचे ‘तुला आरू तेजा’, ‘सुमा परसते’ यासारखे आसामी चित्रपट आणि आसामी भाषेतील ‘इल्लिगल’, हिंदीतील ‘रोल प्ले’, बंगालीमधली ‘रुपांतर’ व भोजपुरी भाषेतील ‘गँगस्टर बबुआ’ या वेबसिरीज गाजल्या आहेत.