BIG NEWS | मुलांच्या शाळांची वेळ बदलली, आता या वेळेत भरणार शाळा

नागपूर | महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळच्या सत्रामध्ये तर माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारच्या सत्रामध्ये भरले जात आहेत. परंतु आता ही परंपरा तोडली जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शाळांच्या वेळा बदलण्याची घोषणा विधिमंडळात केली.

बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. यामुळे लहान मुलांच्या शाळांची वेळ बदलण्याची सूचना राज्यापाल रमेश बैस यांनी केली होती. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली.

महापालिका नोकर भरती : पात्र ३८८ उमेदवारांसाठी आमदार लांडगे सरसावले; अधिवेशनात मुद्दा मांडणार : महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन

महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळी भरतात. तर माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारी भरतात. माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे वय 12 वर्षांच्या पुढे तर प्राथमिक शाळांमधील मुलांचे वय 3 ते 10 वर्ष असते. त्यामुळे प्राथमिक शाळा दुपारी हव्यात आणि माध्यमिक शाळा सकाळी हव्यात, अशी सूचना शिक्षणतज्ज्ञांकडून येत होत्या.

याबाबत राज्यपाल रमेश बैस यांनीच सूचना केली. यामुळे आता दुसरीपर्यंतची प्राथमिक शाळा नऊ वाजता होणार आहे. परंतु इतर वर्गांबाबत निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले. शाळांची वेळ बदलली असल्यामुळे आता शहरी पालकांना दिलासा मिळणार आहे.

बापरे : एकाच दिवशी लोकसभा, राज्यसभेतील 67 खासदारांचे निलंबन, संसदेच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई

बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांची शाळा उशिराने सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा, असे राज्यपालांनी अलिकडेच सुचविले होते. आता याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.

दीपक केसरकर म्हणाले की, राज्यपालांच्या या मताशी सरकार सहमत आहे. मात्र एकट्याने याबाबत निर्णय घेणे योग्य नसल्याने तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे केसरकर यांनी सांगितले.