सेन्सोडाईंन तर्फे वर्ल्ड ओरल हेल्थ डे च्या निमित्ताने पुण्यात मोफत डेंटल कँपचे आयोजन

पुणे २० मार्च २०२४ :सेन्सोडाईंन या आघाडीच्या मौखिक आरोग्य ब्रॅन्ड तर्फे १२ मार्च ते ३१ मार्च २०२४ दरम्यान संपूर्ण भारतातील विविध शहरांत मोफत डेंटल कँप्सचे आयोजन करण्यात येत आहे. त्यांच्या हॅशटॅग बी सेन्सिटिव्ह टू ओरल हेल्थ या उपक्रमाचा एक भाग म्हणून तसेच २० मार्च रोजी वर्ल्ड ओरल हेल्थ डे च्या निमित्ताने या कँप्सचे आयोजन करण्यात आले आहे. या कँप्सच्या माध्यमातून सेन्सोडाईन ने भारतीयांमध्ये प्रतिबंधात्मक मौखिक आरोग्या विषयी जागरुकता निर्माण करण्यात येऊन त्याकरता मोफत आणि गुणवत्तापूर्ण दंत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासानुसार जवळजवळ ६० टक्के भारतीयांमध्ये मौखिक आरोग्याच्या समस्या आहेत. पण केवळ ५ टक्के भारतीय लोक हे प्रतिबंधात्मक मौखिक आरोग्याचे उपचार घेतात आणि त्यासाठी कोणताही विमा नसतो. सेन्सोडाईन तर्फे या समस्येवर इलाज मिळवण्यासाठी ग्रामीण भागासह भारतातील विविध शहरात ५०० हून अधिक मोफत डेंटल कँप्सचे आयोजन करण्यात येत आहे.

या डेंटल कँपचे आयोजन हे २१ मार्च २०२४ रोजी खराडी येथेडॉ. अमरीन खान यांच्या देखरेखेखाली होणार आहे. यामध्ये दातांच्या आरोग्याशी निगडीत समस्या जसे सेन्सेटिव्हिटी, हिरड्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्या, दात किडणे आणि एनामेल खराब होणे यासारख्या समस्यांची तपासणी करण्यात येणार आहे. रुग्णांना यावेही त्यांच्या मौखिक आरोग्याशी संबंधित काळजी विषयी जागरुक करुन या कँप्स मध्ये कशा प्रकारे मौखिक स्वच्छता ठेवावी हे सांगण्यात येणार आहे. लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी सेन्सोडाईन ने देशभरातील डेंटल क्लिनिक्सच्या जवळील ५ हजार फार्मसीज बरोबर सहकार्य केले आहे.

या बहुशहरी उपक्रमा विषयी आपले विचार व्यक्त करतांना हॅलेओइन इंडियाच्या ओरल हेल्थकेअर च्या कॅटेगरी हेड भावना सिक्का म्हणाल्या की “ सेन्सोडाईन म्हणून आमचा असा ठाम विश्वास आहे की मौखिक आरोग्य हे एकूण आरोग्यासाठी मुलभूत गोष्टी आहेत. म्हणूनच आम्ही विशेषरुपाने मौखिक आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करुन सर्वांना गुणवत्तापूर्ण डेंटल चेकअप्सचे आयोजन करत आहोत. आम्ही आमच्या हॅशटॅग बी सेन्सिटिव्ह टू ओरल हेल्थ उपक्रमाअंतर्गत देशभरांतील ८० शहरांत परिणामकारक अशा डेंटल कँप्स चे आयोजन करत आहोत. आंम्हाला आशा आहे की यामुळे भारतीय लोक हे मौखिक स्वच्छते विषयी या कँप्स आणि अन्य उपक्रमांच्या माध्यमातून जागरुक होतील.”

भारतीयांमध्ये मौखिक आरोग्य ही वाढती समस्या असतांना सेन्सोडाईंन हॅशटॅग बी सेन्सिटिव्ह टू ओरल हेल्थ या महिनाभर चालणार्‍या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीयांमध्ये केवळ मौखिक आरोग्याबद्दल जागरुकताच नव्हे तर त्यांना मोफत वैयक्तिक डेंटल केअरही उपलब्ध होत आहे. हे साध्य करण्यासाठी सेन्सोडाईंन ने सर्वसमावेशक मल्टीमिडिया योजना आखली असून मोफत डेंटल कँप्स च्या माध्यमातून व्यावासायिक डेंटल केअर संपूर्ण भारतात उपलब्ध करुन दिली असून यामुळे भारतीयांना त्यांच्या मौखिक आरोग्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल.