New Year 2024 : नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहर परिसरात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त; हे’ रस्ते वाहनांसाठी बंद; अनेक ठिकाणच्या वाहतुकीत बदल, अनेक नियम आणि पोलिसांची करडी नजर, जाणून घ्या सर्व काही एकाच क्लिकमध्ये

पुणे : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे (New Year 2024) स्वागत करण्यासाठी शहातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यासह काही संवेदनशील भागात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुणेपोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Samsung Galaxy S24 : आयफोनला टक्कर देणाऱ्या Samsung Galaxy S24 सीरीजची किंमत समोर

शहरातील कॅम्प परिसर, फर्ग्युसन रस्ता परिसर, विविध मॉल्स, हॉटेल्स, लॉज, ढाबे, बस, रेल्वे स्थानक, मंदीर, चर्च व धार्मिक स्थळांची तपासणी करण्यात येत आहे. यावेळी संशयित व्यक्ती आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून योग्य ती खबरदारी पुणे पोलिसांकडून घेतली जात आहे. ३१ डिसेंबर व नुतन वर्षाच्या स्वागत बंदोबस्तादरम्यान कुठेही घातपाताची घटना घडणार नाही, चेंगरा-चेंगरी होणार नाही, विशेषत: महिलांची सुरक्षितता, चैन स्नॅचिंग, पाकीटमारी सारख्या घटना घडणार नाहीत ही बंदोबस्ताची उद्दिष्ट्ये निश्चित करण्यात आली आहेत.

MORNING BIG NEWS : शरद पवार गटाला मोठा धक्का…

यासह शहरातील विविध भागांमध्ये नाकाबंदी देखील करण्यात येणार असून, वाहतूक शाखेकडून ट्रिपल सीट, ड्रंक अँड ड्राईव्ह, मॉडिफाय सायलेंसर व अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच शहरातील महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून तसेच श्वान पथकांकडून तपासणी देखील केली जणार आहे. शहरातील या भागांमध्ये जलद प्रतिसाद पथक (क्युआरटी) आणि दामिनी पथक देखील तैनात असणार आहे.

Rashmi Shukla New DGP of Maharashtra : रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

तसेच नागरिकांना होणतीही आक्षेपार्ह्य माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ ०२०-२६१२६२९६ / ८९७५२८३१०० / ८९७५९५३१०० (व्हॉट्सअप) अथवा ११२ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

(हेही वाचा – शाळेच्या सहलीत मुख्याध्यापिकेचा विद्यार्थ्यासोबत रोमान्स, Photo Viral; प्रिन्सिपलवर काय कारवाई होणार याकडे लक्ष)

असा असेल पोलिस बंदोबस्त..

– अपर पोलिस आयुक्त – ०२

– पोलिस उपायुक्त – ०५

– सहायक पोलिस आयुक्त – १०

– पोलिस निरीक्षक – ४०

– सहायक पोलिस निरीक्षक / उपनिरीक्षक – १५०

– पोलिस अंमलदार – २७००

– छेडछाड विरोधी पथक – ३२

– दामिनी पथक – १६

वाहतुक शाखेचा बंदोबस्त..

– पोलिस उपायुक्त – ०१

– सहायक पोलिस आयुक्त – ०३

– पोलिस निरीक्षक – १४

– सहायक पोलिस निरीक्षक / उपनिरीक्षक – ३३

– पोलिस अंमलदार – ५७०

– फिक्स पॉईंट – ३३

– डी डी पथक – २३

– पेट्रोलिंग मोबाइल – २७

पुण्यातील मुख्य चौकात आणि मुख्य रस्त्यांलगत पोलिसांचे पथक तैनात राहणार आहे. रस्त्यावर मध्यरात्री होणारा धुडघुस थांबवण्यासाठी नाकाबंदी करण्यात येणार आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांवर गेल्या दोन दिवसांपासून कारवाई सुरू केली आहे. बिअर बार, पब आणि हॉटेल्सच्या परिसरात मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. अमली पदार्थ तस्कर आणि त्याचे सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. पुणे शहरात 3500 अधिक पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचारी तैनात असणार आहे. शहरातील विविध भागात आज सायंकाळपासून नाकाबंदी असणार आहे. शहरातील अनेक मुख्य रस्ते आज सायंकाळनंतर वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

पोलिसांची कसलीच भीती नाही! भर दिवसा डोक्यात गोळ्या घालून हत्या

कोकणात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आता खाण्याची मेजवानी असणार आहे. थर्टीफस्टच्या सेलिब्रेशनच्या पार्टीत २५ वेगेगळ्या प्रकरणाचे सीफुड डिशेस असणार आहे. चमचमीत आणि झणझणीत सीफूडवर खवय्यांना ताव मारता येणार आहे. सुरमई फ्राय, बांगडा फ्राय, बोंबील फ्राय, पापलेट फ्राय आणि कोकणी फुडची मेजवानीचा मेनू असणार आहे. २५ वेगवेगळ्या सीफुडच्या चवीने पर्यटकांच्या तोंडाला पाणी सुटणार आहे.

थर्टी फर्स्ट निमित्त ठाण्यात ठाणे गुन्हे शाखा पोलिसांची धडक कारवाई सुरु केली आहे. ठाण्यातील घोडबंदर कासारवडवली गावाच्या लगत रेव पार्टी करत असताना 100 लोकांना ठाणे गुन्हे शाखा उपयुक्त शिवराज पाटील, एसीपी, युनिट पाच आणि युनिट दोन यांच्या संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली आहे. चरस, गांजा, अल्कोहोल, एमडी अशा विविध नशा करण्यासाठी अमली पदार्थ या पार्टीमध्ये पुरवण्यात आले होते. तसेच कासारवडवली लगत रेव्ह पार्टीच्या ठिकाणावरून 25 मोटरसायकल देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नववर्ष स्वागतासाठी डेक्कन, लष्कर भागातील वाहतुकीत बदल; ‘हे’ रस्ते वाहनांसाठी बंद

पुणे : सरत्या वर्षाला निरोप देऊन २०२४ या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, तसेच फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर पुणेकरांची मोठी गर्दी होते. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने रविवारी (ता. ३१) सायंकाळी पाचनंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल केले आहेत. मध्यरात्री गर्दी कमी होईपर्यंत या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

वाय जंक्शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून वाहतूक कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळवण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, तसेच अरोरा टॉवर्सकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक इस्ट स्ट्रीटवरुन इंदिरा गांधी चौकाकडे वळवण्यात येणार आहे. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक लष्कर पोलीस ठाण्याकडे वळवण्यात येणार आहेे. सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

कोथरूड आणि कर्वे रस्त्याकडून येणारी वाहतूक खंडोजीबाबा चौक येथे बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, अलका चित्रपटगृहाकडे वळवण्यात येणार आहे.
जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन झाशीची राणी चौकातून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक गोखले स्मारक चौक, उपरस्ते, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी रस्तामार्गे वळवण्यात येणार आहे.

लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात रविवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी पाचनंतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. महात्मा गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौक ते अरोरा टॉवर्स चौक दरम्यान वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पहाटे पाचपर्यंत वाहनांना बंदी राहणार आहे.