Samsung Galaxy S24 : आयफोनला टक्कर देणाऱ्या Samsung Galaxy S24 सीरीजची किंमत समोर

Samsung Galaxy S24

Samsung Galaxy S24 सीरीज नवीन वर्षात Galaxy Unpacked event च्या माध्यमातून सादर केला जाईल. नवीन लाइनअपमध्ये Galaxy S24, Galaxy S24+ आणि Galaxy S24 Ultra लाँच केले जाण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून ह्या सीरिज बद्दल माहिती समोर आली आहे. सर्व स्‍पेक्‍स लीक करण्यात आले आहेत. कलर व्हेरिएंट्सचा देखील खुलासा झाला आहे. परंतु सॅमसंगनं मात्र अधिकृतपणे ह्याबाबत काही सांगितले आहेत. आता ह्या सीरिजची किंमत समोर आली आहे, ही युरोपियन किंमत आहे.

Samsung Galaxy S24
Samsung Galaxy S24

Samsung Galaxy S24 किंमत

GalaxyClub च्या रिपोर्टनुसार, सॅमसंगच्या नवीन फ्लॅगश‍िप सीरीजची किंमत Galaxy S23 सीरीज प्रमाणेच असण्याची शक्यता आहे. Galaxy S24 Ultra थोडा महाग केला जाऊ शकतो. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आलं आहे की १२८जीबी स्टोरेज असलेल्या गॅलेक्सी S24 ची किंमत ८९९ युरो (८२,८०० रुपये) असेल. २५६जीबी व्हेरिएंटची किंमत ९५९ युरो (जवळपास ८८,३२६ रुपये) असण्याची शक्यता आहे.

MORNING BIG NEWS : शरद पवार गटाला मोठा धक्का…

Gaalxy S24+ स्मार्टफोन ११४९ युरो (जवळपास १,०५,८२६ रुपये) मध्ये लाँच केला जाईल आणि तर ५१२जीबी असलेला व्हेरिएंट १२६९ युरो (जवळपास १,१६,८९९ रुपये) मध्ये येऊ शकतो. Galaxy S24 Ultra चा ५१२जीबी मॉडेल १५६९ युरो (जवळपास १,४४,५३४ रुपये) मध्ये येऊ शकतो.

Rashmi Shukla New DGP of Maharashtra : रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

Samsung Galaxy S24
Samsung Galaxy S24

आधीच्या लीक रिपोर्टनुसार, नवीन सॅमसंग सीरीजमध्ये AMOLED LTPO डिस्‍प्‍ले असेल. Galaxy S24 स्‍मार्टफोनमध्ये ६.२ इंचाचा FHD+ पॅनल असेल, तर Galaxy S24+ आणि Galaxy S24 Ultra मध्ये ६.७ इंच आणि ६.८ इंचाचा QHD+ पॅनल दिला जाईल. अल्‍ट्रा मॉडेलमध्ये २०० मेगाक्पिसलचा कॅमेरा असेल, तसेच बाकी दोन्ही मॉडेल्समध्ये ५० मेगापिक्‍सलचा ट्र‍िपल कॅमेरा सेटअप असू शकतो.

(हेही वाचा – शाळेच्या सहलीत मुख्याध्यापिकेचा विद्यार्थ्यासोबत रोमान्स, Photo Viral; प्रिन्सिपलवर काय कारवाई होणार याकडे लक्ष)

Galaxy S24 आणि Galaxy S24+ मध्ये ८ जीबी रॅम दिली जाईल. Galaxy S24 Ultra मध्ये १२ जीबी रॅम मिळेल असं सांगण्यात आलं आहे. हे फोन अँड्रॉइड १४ ओएसवर चालतील, ज्यावर वनयुआय ६.१ ची लेयर असेल. नवीन डिवाइस ऑरेंज, पर्पल आणि वाइट कलर्स मध्ये येतील.

पोलिसांची कसलीच भीती नाही! भर दिवसा डोक्यात गोळ्या घालून हत्या