LPG सिलेंडर ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्या कपात करण्यात आली आहे. यानंतर आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना प्रत्येक सिलिंडरवर सुमारे 40 ते 40 रुपयांचा नफा मिळणार आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
सरकारी तेल विपणन कंपन्यांनी, OMC ने 19 किलो LPG सिलेंडरची किंमत 39.50 रुपयांनी कमी केली आहे. तेल विपणन कंपन्यांनी म्हटलं आहे की, व्यावसायिक सिलेंडरच्या नवीन किंमती आजपासून म्हणजेच, 22 डिसेंबरपासून लागू झाल्या आहेत. आजपासून देशातील काही प्रमुख शहरांमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत कमी झाली आहे.
आज किमतीतील बदलानंतर मुंबईत सर्वात स्वस्त एलपीजी सिलिंडर उपलब्ध झाला आहे, तर चेन्नईच्या ग्राहकांना सर्वाधिक किंमत मोजावी लागणार आहे. चार महानगरांमध्ये एलपीजीच्या किमती मुंबईत सर्वात कमी आणि चेन्नईमध्ये सर्वाधिक आहेत. कपातीनंतर, मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आजपासून 1,710 रुपयांवर आली आहे, तर चेन्नईमध्ये प्रभावी किंमत 1,929 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याचप्रमाणे, आता दिल्लीत किंमत 1,757 रुपये आणि कोलकातामध्ये 1,868.50 रुपये झाली आहे.
Brijbhushan Singh’s son : ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाने झळकावले पोस्टर; पोस्टरवर लिहिले असे काही की…
यापूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत होत्या. गेल्या 3 महिन्यांत त्यांच्या किमतींमध्ये तीनदा वाढ करण्यात आली होती आणि त्यादरम्यान भाव 320 रुपयांच्या वर गेले होते. गेल्या वेळी, या महिन्याच्या पहिल्या दिवशी, 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात प्रत्येकी 21 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या किमती 101 रुपयांनी आणि ऑक्टोबर महिन्यात 209 रुपयांनी वाढल्या होत्या.
घरगुती गॅसच्या दरात ३० ऑगस्ट २०२३ रोजी २०० रुपयांची कपात करण्यात आली होती. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार आजही १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅसच्या दरात कोणताही बदल नाही.