आज ‘मिस्टर, मिस, किड्स महाराष्ट्र २०२३ सीझन ५’ चे आयोजन; युएस स्क्वेअर मिडीया ॲण्ड पब्लिसिटीकडून अनेकांवर होणार कौतुकाचा वर्षाव; पुण्यासह राज्यभरातील पत्रकार आणि संपादकांचा आज होणार गौरव

पुणे : युएस स्क्वेअर मिडीया ॲण्ड पब्लिसिटी आयोजित ‘मिस्टर, मिस, किड्स महाराष्ट्र २०२३ सीझन ५’ चे आज कुमार पॅसिफिक मॉल, शंकर शेठ रोड, शांती नगर सोसायटी, पुणे – ४११०४२ येथे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची वेळ दुपारी ३ ते ६ अशी ठेवण्यात आली असून कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. प्रत्येक वर्षी लक्ष वेधणाऱ्या या कार्यक्रमाच्या फायनल विनरकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक व युएस स्क्वेअर मिडीया ॲण्ड पब्लिसिटीचे संस्थापक उद्धव खरड यांच्या ‘आतिशबाजी’ या नवीन गाण्याचा रिलीज कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाचे यंदाचे ५वे वर्ष आहे. पुण्यात रंगणाऱ्या या दिमाखदार सोहळ्यात चित्रपट सृष्टीसह फॅशन, बिजनेस, डॉक्टर, पत्रकार, समाजकार्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार आहे.

या कार्यक्रमात ‘आदर्श पत्रकार’ तथा ‘आदर्श संपादक’ अशा दोन उच्च पुरस्काराने विविध पत्रकारांचा आणि संपादकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

यात डॉ. विश्वासराव आरोटे (संपादक दैनिक समर्थ गांवकरी), श्री. लक्ष्मण साबळे (व्यवस्थापकीय संपादक पुणे प्रहार) श्री. नवनाथ जाधव (कार्यकारी संपादक दैनिक समर्थ गांवकरी), सौ. सुचिता भोसले-हरपळे (संपादिका न्यूज प्रहार), श्री. गौरव सुर्यकांत मैड (समुह संपादक दैनिक समर्थ गांवकरी), श्री. हसन इमाम शेख (संपादक दै. दायित्व), श्री. दशरथ चव्हाण (नवी मुंबई विभागीय संपादक दैनिक समर्थ गांवकरी), सौ. सुरेखा सावंत-मते (संपादीका दै. आरंभ पर्व), डॉ. स्वामी वैदू (मुंबई विभागीय संपादक दैनिक समर्थ गांवकरी), श्री. अमोल भोसले (प्रतिनिधी दै. केसरी) श्री. संजय फुलसुंदर, (महा-व्यवस्थापक दैनिक समर्थ गांवकरी), सौ. माधवी जोशी (संपादिका अभिमान टाईम्स), श्री. अभिषेक बांदर्गे, (प्रतिनिधी दै. विश्वदर्पण), श्री. संजय गायकवाड (संपादक पुणे मेट्रो), श्री. अभिषेक मरगळे (प्रतिनिधी आरंभ पर्व), श्री. प्रतिक गंगणे (संपादक पुणे प्रहार), सौ. शिल्पा देशपांडे (सर्वोत्कृष्ट निवेदिका, संस्थापिका कायझेन मिडीया), सौ. ज्योती नाळे (संपादिका दै. संध्या), श्री. नितेश गोटे (व्यवस्थापक एक्सपर्ट-व्हिव टेक्नोलॉजी), श्री. तुकाराम गोडसे (संपादक रॉयल मिडीया न्यूज), श्री. सुमित आंबेकर (संपादक मिडीया वर्ल्ड न्यूज), श्री. गौरव कुलकर्णी (व्यस्थापकीय संपादक दै. लोकमान्य सांजवार्ता), सौ. सारिका रोजेकर (उपसंपादिका दै. राष्ट्रसंचार), सौ. प्रार्थना दत्ता बुवा (संस्थापिका पुष्पम ब्युटी पार्लर ॲण्ड इन्स्टिट्यूट) श्री. सागर दौलतडे (समुह संपादक दैनिक समर्थ गांवकरी) यांसह आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.