Crime: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या…

Crime: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या…

Crime News: गोठीवली येथील तलावाजवळ मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र अज्ञात लुटारुने खेचुन पलायन केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.

अंघोळ, ब्रश न करणाऱ्या पतीविरोधात महिलेची कोर्टात धाव; न्यायालयाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय

रबाळे पोलिसांनी या घटनेतील लुटारु विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

Poonam Pandey Death Fake News : ‘पूनम तुझी लाज वाटते! केवळ प्रसिद्धीसाठी तू…’

या घटनेतील तक्रारदार महिला वंदना साबळे (47) या रबाळे येथील नोसील नाका येथे कुटुंबासह राहण्यास आहेत. वंदना साबळे या दरदिवशी सकाळी 6 वाजता मॉर्निंग वॉकसाठी गोठीवली येथील खदान तलावाजवळ जातात.

Crime: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या…

Husband Wife : नवऱ्याला जीवे मारण्यासाठी बायकोने केला होता खतरनाक प्लॅन, वेळीच झाली पोलखोल

गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी देखील त्या मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. यावेळी वॉकींग आणि व्यायाम झाल्यानंतर त्या तेथील कट्टयावर बसल्या होत्या.

BIG NEWS : जनगणनेच्या बहाण्याने घरात घुसले अन् चाकूच्या धाकाने… अमरावती हादरलं

याचवेळी त्यांच्या पाठीमागील झाडीतून आलेल्या एका लुटारुंने वंदना साबळे यांच्या गळ्यातील 12.5 ग्रॅम वजनाचे 50 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र खेचुन झाडीतुन माऊली हाईट्स सोसायटीच्या दिशेने पलायन केले.

Crime : मधुचंद्राच्या रात्री पत्नीला कळले नवरा नपुसंक, ‘माझा मुलगा कामाचा नाही..’ म्हणत सासरा बेडरुममध्ये

यावेळी वंदना साबळे यांनी आरडा-ओरड केली असता, रस्त्यावरुन चालत जाणाऱ्या त्यांच्या भाच्याने सदर लुटारूंचा पाठलाग केला. मात्र सदर लुटारु त्याच्या हाती लागला नाही. त्यानंतर वंदना साबळे यांनी रबाळे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

आधी गोळ्या झाडल्या अन् मग… पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं? घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर