Crime : अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने वार करून तरुणाचा खून

पुणे (Crime)- दोन अल्पवयीन मुलांनी कोयत्याने वार करून तरुणाचा भररस्त्यात खून केल्याची धक्कादायक घटना बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्यावर चव्हाण वस्तीत घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

धीरज प्रदीप भोसले (वय-२७, रा. बाराथे वस्ती, खडकी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी प्रियांशू भोसले यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

HOT NEWS

husband-wife : पतीने पत्नीला लॉजवर रंगेहात पकडले; रूमचा दरवाजा तोडला, पत्नी प्रियकराबरोबर नको त्या अवस्थेत सापडली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज हा वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. तो मंगळवारी दुपारी रस्त्याच्या कडेला बसला होता. त्यावेळी जुन्या वादातून दोन अल्पवयीन मुलांनी धीरजच्या डोक्यात, तोंडावर कोयत्याने आणि लाकडी दांडक्याने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या धीरजचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान, मागील महिन्यात आंबेडकर चौकात खडकी बाजारातील एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती. या परिसरात अवैध व्यवसाय सुरू असून, या परिसरातील गुंडांकडून व्यावसायिकांना त्रास होत असल्याची तक्रार आहे. या भागातील अवैध व्यवसाय बंद करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.