BIG NEWS : पुणे हादरलं ! चार तोळे सोनं आणि १० लाख खर्च करूनही नवविवाहितेचा छळ; वडिलांना फोन करून घेतला गळफास; अवघ्या महिन्याभराच्या संसाराचा अंत…

BIG NEWS : पुणे हादरलं! चार तोळे सोनं आणि १० लाख खर्च करूनही नवविवाहितेचा छळ; वडिलांना फोन करून घेतला गळफास; अवघ्या महिन्याभराच्या संसाराचा अंत…

पुणे | हडपसर

पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी हगवणे आत्महत्येची घटना अजूनही ताजी असतानाच, पुणे शहरातील हडपसर परिसरात आणखी एका नवविवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवकी उर्फ दीपा प्रसाद पुजारी (वय २२) असं मृत विवाहितेचं नाव असून, तिच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

माझे पती नसताना हे लोक…; हगवणे कुटुंबीयांच्या थोरल्या सुनेचा खळबळजनक खुलासा

दीपाचं लग्न १८ एप्रिल २०२५ रोजी विजयपूर येथील बसव मंगल कार्यालयात प्रसाद चंद्रकांत पुजारी याच्याशी पार पडले होते. या विवाहासाठी दीपाच्या कुटुंबीयांनी तब्बल ४ तोळे सोनं आणि १० लाख रुपयांचा खर्च केला होता. मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सासरच्यांकडून तिच्यावर मानसिक त्रास सुरू झाला.

🔹 हुंडा, भांडी आणि मानपानावरून वाद

सासरच्या लोकांनी भांडी, फ्रीज व इतर मानपान न दिल्याच्या कारणावरून दीपावर ताशेरे ओढले. तिच्यावर सासू-सासरे आणि पतीकडून सातत्याने शिवीगाळ आणि मानसिक त्रास होऊ लागला. यामुळे दीपा सतत तणावाखाली होती.

🔹 वडिलांना शेवटचा फोन: “सगळे मला मारतात”

१८ मे रोजी दीपाने रडत रडत आपल्या वडिलांना फोन करून संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला. तिने पती, दीर, सासू आणि सासरे यांनी मारहाण करत असल्याचा आरोप करत मदतीची विनंती केली होती. वडिलांनी तिला समजावत परिस्थिती सुधारेल, असे सांगितले. पण दुसऱ्याच दिवशी – १९ मे रोजी – दीपाने हडपसरमधील राहत्या घरी गळफास लावून आपलं जीवन संपवलं.

🔹 पोलीस गुन्हा दाखल; चौघांवर कारवाई

या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तिच्या पतीसह सासरच्या इतर सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद पुजारी (पती), प्रसन्ना पुजारी (दीर), सुरेखा पुजारी (सासू) आणि चंद्रकांत पुजारी (सासरे) यांच्याविरुद्ध दीपाच्या कुटुंबीयांनी तक्रार दिली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.


महत्वाचं:

या घटनेमुळे पुन्हा एकदा हुंडाबळीच्या घटना आणि सासरी होणाऱ्या छळाचं वास्तव समोर आलं आहे. अवघ्या एका महिन्यात दोन तरुणींचा बळी गेल्यानं समाजमन हादरलं आहे. कायद्याचा धाक आणि सामाजिक बदल ही दोन्ही तितकीच गरजेची गरज वाटतेय.