देशभरातील क्रिकेटप्रेमाच्या लाटेवर स्वार होत वी ने सादर केले नेटवर्क अवतार – नेटीज
भारतातील आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी, वी ने आपले नवीन कॅम्पेन आज लॉन्च केले. आर्थिक वर्ष २०२४-२०२५ च्या अवघ्या ६ महिन्यांमध्ये १,००,००० हुन जास्त टॉवर आपल्या नेटवर्कमध्ये समाविष्ट केल्याचा महत्त्वाचा टप्पा वी ने या नवीन कॅम्पेनमध्ये अधोरेखित केला आहे. नेटवर्क पायाभूत सोयीसुविधा अधिकाधिक मजबूत करण्याच्या वी च्या कटिबद्धतेवर या कॅम्पेनमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे, नेटवर्क पायाभूत सोयीसुविधा विस्ताराची व्याप्ती आणि वेग यांना अधोरेखित केले आहे.
नेटवर्क विस्तारामध्ये मिळवले जात असलेले यश अतिशय अभिनव आणि मनोरंजक पद्धतीने मांडणाऱ्या या कॅम्पेनमध्ये वी चे नवे नेटवर्क अवतार – नेटीज प्रस्तुत करण्यात आले आहे. मोबाईल टॉवर्सनी प्रेरित होऊन हे ऍनिमेटेड कॅरेक्टर्स तयार करण्यात आले आहेत. सध्या देशभर पसरलेल्या आयपीएल उत्साहाच्या लाटेवर स्वार होऊन वी ने आणलेले हे अवतार क्रिकेट खेळाडूंच्या दमदार टीमप्रमाणे आहेत आणि या सीझनची सर्वात चांगल्या टीमचे प्रतीक आहेत. त्यांची मजामस्ती आणि उत्साही स्क्वाड वी च्या वेगाने वाढत असलेल्या नेटवर्कची ताकद, व्याप्ती आणि गती दर्शवतो. नेटवर्क क्रिडेन्शियल्स अतिशय अनोख्या व संस्मरणीय पद्धतीने दाखवण्यात आले आहेत.
हल्लीच्या काही महिन्यांमध्ये वी ने नेटवर्क विस्तारामध्ये वेगवान प्रगती केली आहे. मुंबई, चंदिगढ आणि पाटणामध्ये ५जी सुरु केले आहे, लवकरच दिल्ली आणि बंगलोरमध्ये देखील ते सुरु करण्याची तयारी केली जात आहे. त्यासोबतच वी ने आपले ४जी नेटवर्क देखील मजबूत केले आहे, नवीन टॉवर्स उभारून आणि ९०० MHz, १८०० MHz, २१०० MHz आणि २३०० MHz या स्पेक्ट्रम बँड्समध्ये अपग्रेड्स करून क्षमता व कव्हरेज वाढवले आहे. त्यामुळे इनडोअर व आउटडोअर कव्हरेज मजबूत झाले आहे, डेटाचा वेग वाढला आहे आणि सेवा विस्तार झाला आहे, त्यामुळे वी युजर्सना अधिक चांगला ४जी अनुभव मिळत आहे. १.०७ बिलियन युजर्स वी सेवांचा आनंद घेत आहेत.
यावेळी वी चे चीफ मार्केटिंग ऑफिसर श्री अवनीश खोसला यांनी सांगितले, “आमच्या नेटवर्क विस्तारामध्ये आम्ही फक्त व्याप्तीवर लक्ष केंद्रित करत नाही तर स्मार्ट व धोरणात्मक तैनाती देखील करतो. भरपूर ट्रॅफिक असलेल्या भागांना प्राधान्य देऊन, स्पेक्ट्रमचा सक्षमतेने लाभ घेऊन आणि दर्जेदार इनडोअर अनुभव प्रदान करण्यात भर देऊन आम्ही असे नेटवर्क निर्माण करत आहोत जे भविष्यासाठी सज्ज आहे आणि उच्च गुणवत्तापूर्ण आहे. सहा महिन्यांमध्ये १ लाख नवीन टॉवर्स उभारून आणि सर्वोत्तम ४जी अनुभव प्रदान करून, वी ने सातत्यपूर्ण, दर्जेदार कनेक्टिविटी देऊन आपल्या ग्राहकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित केली आहे.”
ऑगिल्वीचे सिनियर ईसीडी श्री रोहित दुबे यांनी सांगितले, “वी साठी कॅम्पेन तयार करताना आम्ही असे मानतो की, प्रत्येक कम्युनिकेशनमधून आनंद चमकला पाहिजे आणि म्हणूनच आम्ही एक टेक्निकल स्टोरी सांगण्यासाठी ऍनिमेशनची निवड केली. या फिल्ममध्ये टेलिकॉम टॉवर्सना टीम सदस्य म्हणून प्रस्तुत करण्यात आले आहे, आमचे मजबूत नेटवर्क एखाद्या क्रिकेट टीमप्रमाणे आहे, एकही बॉल किंवा एकही सिग्नल कधी मिस करत नाही. एक लाख नवीन टॉवर्स, एक दमदार टीम. ही आमची सर्वात मजबूत साईड आहे.”
या ३६० डिग्री कॅम्पेनची संकल्पना ऑगिल्वी इंडियाने केली आहे, यामध्ये दोन टीव्हीसी आहेत. कॅम्पेनचे प्रसारण १७ मे पासून सुरु झाले आहे. टीव्ही, ओटीटी, रेडिओ, सोशल मीडिया आणि युट्युब अशा सर्व प्लॅटफॉर्मवर ते चालवले जात आहे.
पहिल्या टीव्हीसीची एक झलक
- टीव्हीसी १: द कॅच: सिक्ससाठी स्टेडियमच्या बाहेर टोलवण्यात आलेल्या बॉलची अशक्य कॅच नेटीज किती यशस्वीपणे झेलतात ते या फिल्ममध्ये दाखवण्यात आले आहे.
- टीव्हीसी लिंक: https://youtu.be/rNWrp5rAnX8