सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव; रामराज्याच्या दिशेने टाकलेले पाऊल !

By: Editor _2

On: Wednesday, May 7, 2025 4:26 PM

Google News
Follow Us

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव !

देशविदेशांतून २५ हजार, तर पुणे जिल्ह्यातून २ हजारहून अधिक हिंदू उपस्थित रहाणार !

पुणे – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘विश्वकल्याणार्थं रामराज्यासमान सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी गोवा येथील फोंडा येथील फर्मागुडी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी समर्पित संत, महंत, हिंदुत्वाचे शिलेदार, विचारवंत, केंद्रीय मंत्री, काही राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच २५ हजारांहून अधिक साधक, धर्मप्रेमी हिंदू यांची उपस्थिती हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. हा दिव्य शंखनाद हा रामराज्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल असेल. या महोत्सवासाठी पुणे जिल्ह्यातून २ हजारहून अधिक सनातन संस्थेचे साधक, धर्मप्रेमी हिंदु उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सनातनचे श्री. चैतन्य तागडे यांनी श्रमिक पत्रकार भवन,गांजवे चौक,नवी पेठ,पुणे येथील ६ मे या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान कडेपठारचे विश्वस्त ॲड. मंगेश जेजुरीकर, श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे सचिव डॉ. तुषार पाचुंदकर पाटील, पुणे शहर भाजपच्या महिला मोर्चा महामंत्री सौ उज्वला गौड, चिंतामणी प्रासादीक दिंडी तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त हभप दत्तात्रय चोरघे महाराज, हिंदु जनजागृती समितीच्या कु.क्रांती पेटकर हे मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनीही महोत्सवाची माहिती दिली. 

      सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २५ वर्षे सनातन संस्था आदर्श आणि संस्कारी पिढी घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही देशात रामराज्य स्वरूप ‘सनातन राष्ट्रा’साठी सामूहिक संकल्प केला आहे. याद्वारे सर्व आध्यात्मिक संस्था आणि हिंदू संघटना यांच्यातील धर्मबंधुत्व अधिक दृढ होईल. सध्या भारतासमोर उभ्या असलेल्या अंतर्गत आणि बाह्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सनातन धर्म, त्याची मूल्ये आणि त्याचे रक्षण करणे हे आवश्यक झाले आहे. एकूणच गो, गंगा, गायत्री, मंदिरे, वेदादी धर्मग्रंथ यांना पुनर्वैभव प्राप्त करून देणाऱ्या ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे. गोव्यात होणारा भव्य लोकोत्सव धर्म आणि अध्यात्म यांची दिव्य ज्ञानगंगा प्रवाहित करणारा ठरेल.

या महोत्सवाला ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकरजी, पतंजली योगपीठाचे संस्थापक प.पू. योगऋषि स्वामी रामदेवजी, ‘सनातन बोर्ड’चे प्रणेते पूज्यश्री देवकीनंदन ठाकूरजी महाराज, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपादजी नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथजी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोदजी सावंत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, तेलंगाणा येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह, तसेच काशी-मथुरा येथील मंदिरांचा खटला लढवणारे अधिवक्ता विष्णु जैन आदी अनेक मान्यवरांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे.

जिल्ह्यातून जाणारे संत-महंत, तसेच विशेष मान्यवर !

या भव्य-दिव्य महोत्सवासाठी पुणे जिल्ह्यातून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान’चे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर, जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे १० वे वंशज ह.भ.प. माणिक महाराज मोरे, ‘जय शंकर प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरेश उपाख्य पप्पाजी पुराणिक, श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे सचिव डॉ. तुषार पाचुंदकर पाटील, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, पुणे शहर भाजपच्या महिला मोर्चा महामंत्री सौ उज्वला गौड, विंग कमांडर शशिकांत ओक, प्रसिद्ध लेखक श्री. अभिजित जोग, ‘यूथ फॉर पनून कश्‍मीर’चे राष्‍ट्रीय संयोजक श्री. राहुल कौल आदींसह ५० हून अधिक प्रतिष्ठित येणार आहेत. 

‘सनातन राष्ट्रा’ साठी एक कोटीचा रामनाम जपयज्ञ व संतसभा !

 या महोत्सवा’चे ‘धर्मेण जयति राष्ट्रम् ।’ (अर्थः धर्मामुळे राष्ट्राचा विजय होतो) हे घोषवाक्य आहे. ‘सनातन राष्ट्रा’साठी ‘रामराज्य संकल्प जपयज्ञा’द्वारे एक कोटी श्रीरामनामाचा जप करण्यात येणार आहे. देशभरातील सनातन धर्मीय संत, महंत तथा धर्मगुरु यांच्या तेजस्वी वाणीद्वारे सनातन राष्ट्राचे उद्‌घोष करण्यासाठी संतसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘हिंदु राष्ट्ररत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार वितरण

वर्षानुवर्षे सनातन धर्माच्या सेवेसाठी समर्पित होऊन विशेष कार्य करणाऱ्या हिंदूवीरांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ हा जीवनगौरव पुरस्कार, तसेच धर्मासाठी लढणाऱ्या धर्मरक्षकांना ‘सनातन धर्मश्री’ हा पुरस्कार वंदनीय संतांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

लोककलेचे सादरीकरण आणि शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन!

या भव्य कार्यक्रमातून गोव्यामधील लोककलांचेही सादरीकरण करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील प्राचीन शस्त्रे, सनातन संस्कृती, राष्ट्र, कला, आयुर्वेद, आध्यात्मिक वस्तू यांचे भव्य प्रदर्शनही लावण्यात येणार आहे.

संतांच्या पादुकांचे दर्शन !

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज (इंदूर), समर्थ रामदासस्वामी, सज्जनगड, श्रीधरस्वामी, श्री कानिफनाथ स्वामी, प.पू. टेंबेस्वामी, समर्थ शिष्य श्री कल्याणस्वामी, श्री साईबाबा, संत वेणाबाई, श्री सिद्धारूढस्वामी (हुबळी), प.पू. गगनगिरी महाराज, प.पू. गोंदवलेकर महाराज आदी १० हून अधिक संतांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ सर्वांना घेता येणार आहे.

महाधन्वंतरी यज्ञ ! 

१९ मे या दिवशी विश्वकल्याणार्थ तथा सनातन धर्मीयांच्या आरोग्यासाठी महाधन्वंतरी यज्ञ होणार आहे.

या कार्यक्रमाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !

संकेतस्थळ लिंक : https://SanatanRashtraShankhnad.in

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 21, 2026

Malabar मलबार

April 20, 2026

April 18, 2026

April 17, 2026

April 16, 2026

April 16, 2026