पुणेकरांनो लक्ष द्या : सोमवारपासून अनेक भागांना दर आठवड्याला एक दिवस पाण्याचा तुटवडा; वाचा आठवड्याचे दिवस व पाणीपुरवठा बंद असणारे भाग
पुणे : पुणे महापालिकेने शहराच्या दक्षिण भागात पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला असून, येत्या सोमवारपासून (५ मे) आठवड्यातून एक दिवस नियोजनबद्ध पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे कात्रज, आंबेगाव, सिंहगड रस्ता परिसरातील अनेक भागांना दर आठवड्याला एक दिवस पाण्याचा तुटवडा सहन करावा लागणार आहे.
गेल्या दीड महिन्यापासून कात्रज, कोंढवा आणि भारती विद्यापीठ परिसरात दर मंगळवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत होता. ‘लोकसत्ता’ने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महापालिकेने आता अधिकृत वेळापत्रक जाहीर करून पाणीकपातीस अधिकृत रूप दिले आहे.
वडगाव बुद्रुक येथील जलकेंद्रातून या भागांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, उपलब्ध पाणीसाठा अपुरा पडत असल्यामुळे कात्रज आणि परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत होत होता. यामुळे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने चक्राकार पद्धतीने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.
आठवड्याचे दिवस व पाणीपुरवठा बंद असणारे भाग :
सोमवार :
बालाजीनगर, श्रीहरी सोसायटी, गुरुदत्त सोसायटी, साईकृपा सोसायटी
पवार रुग्णालय, कात्रज परिसर, कोंढवा, साईनगर
शांतीनगर, महानंदा सोसायटी, श्रीकृष्ण कॉलनी
मंगळवार :
संपूर्ण सन सिटी परिसर, माणिकबाग, समर्थ नगर
मधुकर हॉस्पिटल परिसर, विठ्ठलवाडी, जुनी धायरी
बारंगणी मळा, पारी कंपनी रस्ता, राजस सोसायटी (कात्रज)
निरंजन सोसायटी, कमला सिटी, कोंढवा खडी मशीन चौक
सिंहगड महाविद्यालय, हब टाउन, कोलते पाटील सोसायटी
बुधवार :
वडगाव बुद्रुक, वडगाव हिंगणे, जाधवनगर
वडगाव गावठाण, हिंगणे, महादेवनगर
राजीव गांधी वसाहत, वाघजाईनगर, सुखदा-वरदा सोसायटी
आंबामाता मंदिरामागील परिसर, सिल्व्हर ओक, सुखसागर नगर, स्वामी समर्थनगर
गुरुवार :
धनकवडी गावठाण, बाळकृष्ण, सौदागर, राजमुद्रा, चित्तविहारी सोसायटी
अक्षयनगर, दौलतनगर, कलानगर, गुलाबनगर, चैतन्यनगर, तळजाई पठार
सन्मित्र, सागर सोसायटी, सहकारनगर भाग १, दाते बसस्टॉप
सुखसागर नगर भाग १, निलया सोसायटी, महादेवनगर भाग २
कोंढवा, गोकुळनगर, वृंदावननगर
शुक्रवार :
आंबेगाव पठार, दत्तनगर भुयारी मार्ग, त्रिमूर्ती चौक
भारती विद्यापीठ, जोगेश्वरीनगर, मोरे-निंबाळकर वस्ती
भारतनगर, दत्तनगर, आगम मंदिर परिसर, संतोषनगर, वंडर सिटी
साईनगर, कोंढवा बु. (गावठाण), कपिलनगर, लक्ष्मीनगर, आचल फार्म
शनिवार :
कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, अखिल नवीन वसाहत (कात्रज)
राजीव गांधी वसाहत, ग्रीन पार्क, अजमेरा पार्क
रविवार :
महादेवनगर भाग १ (कात्रज), आनंदनगर, महावीर नगर
शिव प्लाझा (पिसोळी रस्ता), पारगे नगर, आंबेडकरनगर
पुण्यधाम आश्रम रस्ता
🌐 https://www.aparv.com
🔥 Follow this link to join WhatsApp group: 🔥https://chat.whatsapp.com/KwUuP6pbQBfL3esGdSpWi0
🔥 instagram : 🔥 https://www.instagram.com/aarambhparv/