Youtuber Wife Kills Husband : युट्यूबर पत्नीचे घरातच सुरू होते प्रियकराबरोबर संबंध, पतीनं पाहताच झाला वाद; दोघांनीही कट रचून पतीला संपवलं

Youtuber Wife Kills Husband : हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यात प्रवीण नावाच्या इसमाला त्याची पत्नी रवीना आणि तिच्या प्रियकराचे प्रेमसंबंध कळल्यानंतर दोघांनी मिळून त्याची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्या केल्यानंतर आरोपींनी प्रवीणचा मृतदेह दुचाकीवरून शहराच्या बाहेर असलेल्या नाल्यात नेऊन टाकला होता. रवीना आणि तिचा पती प्रवीण यांचे २०१७ रोजी लग्न झाले होते. त्यांना सहा वर्षांचा एक मुलगा आहे. रवीनाला रिल्स बनवून ते सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा नाद होता. या कारणामुळे दोघांचेही वारंवार भांडण होत असे.

Youtuber Wife Kills Husband

रवीना मुळची रेवडी जिल्ह्यातील होती. लग्नानंतर ती पतीसह भिवानी जिल्ह्यात राहण्यास आली. प्रवीण वाळू आणि दगड वाहून नेण्याच्या दुकानात चालक म्हणून काम करत होता. रवीनाला सोशल मीडियाचा नाद लागल्यामुळे प्रवीण आणि रवीनाचं वारंवार भांडण होत असे. दीड वर्षांपूर्वी रवीनाची ओळख हिस्सार जिल्ह्यातील युट्यूबर सुरेशशी झाली. इन्स्टाग्रामवरून झालेल्या मैत्रीनंतर दोघेही जवळ आले.

WhatsApp : आता WhatsApp वर तुम्ही ठेवू शकता मोठं स्टेटस; १ मिनिटाची लिमिट कितीने वाढवली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मार्च रोजी प्रवीणने पत्नी रवीना आणि सुरेशला त्याच्याच घरात नको त्या अवस्थेत पकडलं. त्यानंतर पती-पत्नीचं कडाक्याचं भांडण झालं. दुसऱ्या दिवशी रात्री रवीना आणि सुरेशने मिळून प्रवीणचा खून केला.

मुलीशी का बोलतो म्हणून मुलावर कोयत्याने वार; प्रकृती गंभीर, क्रिकेट मॅच पाहताना झाली ओळख

या खूनाचा थांगपत्ता लागू नये म्हणून सुरेशने दुचाकीवरून त्याचा मृतदेह शहराच्या बाहेर असलेल्या नाल्यात टाकला. तीन दिवसानंतर नाल्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत सदर मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी आसपासच्या परिसरातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रण तपासले. २५ मार्चच्या रात्री एक दुचाकी संशयास्पदरित्या आढळून आली. या दुचाकीवर हेल्मेट घातलेल्या एका तरूणासह रवीना बसल्याचे आढळून आले.

‘लाडक्या बहि‍णींना’ १५०० रुपयांऐवजी केवळ ५०० रुपयेच मिळणार?

सदर चित्रण पोलिसांच्या हाती लागल्यानंतर रवीनाची चौकशी केली असता तिने खून केल्याचे मान्य केले. तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असून पोलीस तिचा प्रियकर सुरेशचा शोध घेत आहेत.

Pune Businessman Murder : पुण्याच्या व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या, विमानाने पाटण्यात गेले ते परत आलेच नाहीत