त्रिमूर्ती हॉस्पीटल ,परिसर शिवतीर्थ नगर भागातील कचऱ्याचा प्रश्नासाठी मोरेंचा पुढाकार
गेले अनेक वर्ष पासून पुणे महानगरपालिकेतील त्रिमूर्ती हॉस्पिटल परिसर, शिवतीर्थ नगर भागातील नागरिकांना कचऱ्याचा प्रचंड व नाहक मनस्ताप होत आहे. तो थांबवण्यासाठी नागरिकांच्या सेवेत कचऱ्याची गाडी पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी पुणे महानगरपालिकेकडे केली आहे.
आठ दिवसापूर्वी सिंहगड क्षेत्रीय कार्यालय येथे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रूपाली ताई चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची नागरी समस्यांवर ती बैठक घेण्यात आली. त्यामध्ये असणाऱ्या मुद्द्यांमध्ये महत्त्वाचा मुद्दा शिवतीर्थ नगर येथील कचरा उचलणे बाबत व रस्ते साफसफाई बाबत प्रश्न भूपेंद्र मोरे यांनी मांडला होता .
त्या अनुषंगाने नागरिकांच्या कचऱ्याच्या समस्येसाठी धायरी आरोग्य कोठीचे अधिकारी श्री.गजानन गजधने यांनी वडगाव खुर्द शिवतीर्थ नगर, त्रिमूर्ती हॉस्पिटल परिसराची पाहणी केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी या भागातील रस्ते साफसफाईसाठीही कर्मचारी नियुक्ती करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.कचऱ्याची गाडी पूर्ववत सुरू करावी अशी आग्रही मागणी केली.
- त्यावर श्री.गजधने यांनी लवकरात लवकर या समस्या ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासित केले.
- भविष्यात कचऱ्याची समस्या निवारणासाठी योग्य नियंत्रण राखले जाईल असा शब्द भूपेंद्र मोरे , उपस्थित नागरिकांना दिला.
- यावेळी स्वच्छ संस्थेचे कर्मचारी, व नागरिक उपस्थित होते.
- यामुळे परिसरातील कचऱ्याची समस्या सुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
- अस्ताव्यस्त कचऱ्यामुळे होणाऱ्या विविध समस्यांना आळाही बसणार आहे.